स्क्रीप्ट हेच माझे दैवत, दिग्दर्शक हेच माझे गुरू पाहा...प्रिया काय बोलत्येय - sachin pilgaokar
सिटी ऑफ ड्रीम्स च्या पहिल्या यशस्वी सीझननंतर आता दुसरा सीझनशुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात नागेश कुकनूर दिग्दर्शित वेब सिरीजचा हा दुसरा भाग डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. यात प्रिया बापट, एजाझ खान, सचिन पिळगावकर आणि अतुल कुलकर्णी ही कलाकार मंडळी महत्वाच्या भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने प्रिया आणि एजाझ यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. यात वेब सिरीज शूट करताना विविध गमतीजमतीही सांगितल्या. पूर्णिमा गायकवाडच्या भूमिकेसाठी तयारी करताना तिच्या दमदार अभिनयाचे रहस्य सांगितले. स्क्रीप्ट हेच माझे दैवत, दिग्दर्शक हेच माझे गुरू असे शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.