VIDEO : मुसळधार पावसामुळे दुधसागर धबधब्याचे सौंदर्य खुलले - गोवा पाऊस
गोवा - मागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक गोव्याच्या पर्वतरांगामधून ओसंडून कोसळणाऱ्या दुधसागर धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सर्वत्र हाहाकार माजला आहे. हा पाऊस मात्र कोसळणाऱ्या धबधब्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. दुधसागर धबधब्याच्या माथ्यावर कोसळणाऱ्या पावसामुळे एकीकडे दुधसागरचे सौंदर्य खुलले असले तरी धबधब्याच्या प्रवाहामुळे वाहून येणाऱ्या पाण्यामुळे कुळे नदींना पूर आला आहे. याचा फटका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांना बसला आहे.