लखनौची 'ड्रोन गर्ल' मोहसीना आरिफ मिर्झा - लखनौ
लखनौ : रोबोटिक्स क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी लखनौची मोहसीना मिर्झा आपल्या स्वप्नांना नवा आकार देतेय. मोहसीना या केवळ प्रेमळ आणि प्रेरणादायी शिक्षिका नसून त्या एक अनुभवी ड्रोन निर्मात्यासुद्धा आहेत. त्या उत्तम स्काय डायव्हर असून आपलं ज्ञान अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कल असतो. त्यांनी आपलं आयुष्य अशा मुलांच्या स्वप्नांना बळ देण्यात समर्पित केलंय, जे प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेऊ इच्छितात. त्यांनी लखनौच्या मार्टिनियर कॉलेजच्या ड्रोन विभागाच्या प्रमुख म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. 2016 मध्ये मिर्जा यांनी 'इन्वेरो टेक्नो रोबोटिक्स अॅण्ड फ्लाइंग क्लब'ची स्थापना केली तेव्हापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.