Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - कोरोना लसीकरण
मुंबई - देशात गेल्या बुधवारी 17 हजार 407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 89 बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात 14 हजार 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ११ लाख ५६ हजार ९२३ वर पोहोचली आहे. वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यावर कोरोनाचे ढग आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, तमिळनाडू राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडींचा घेतलेला आढावा.