काँग्रेस नेते आझाद यांनी पंतप्रधानांकडे केल्या 'या' पाच मागण्या - देशाचे राजकारण
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांकडे ५ मागण्या केल्याचे सांगितले. राज्याचा दर्जा, विधानसभा निवडणुकीसह लोकशाहीचे पुनरुज्जीवन, काश्मीरी पंडितांचे पुनर्वसन आणि सर्व राजकीय कैद्यांची मुक्तता आणि स्थानिक रहिवासी नियम या मागण्या ठेवल्याचे आझाद यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची ऐतिहासिक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. ही बैठक साडेतीन तास चालली. त्यानंतर आझाद यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.