VIDEO : गंगाघाटावरील थरकाप उडवणारी दृश्ये; नजर जाईल तिथपर्यंत दिसून येतायत पुरलेले मृतदेह.. - गंगाघाट मृतदेह व्हिडिओ
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या किनारी शेकडो मृतदेह पुरण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रयागराजच्या नैनी भागातील देवरख घाट परिसरातील ही दृश्ये अगदीच भीतीदायक आहेत. नदीकिनारी पुरलेल्या मृतदेहांच्या भीतीने लोकांनी त्या बाजूला जाणेही बंद केले आहे. धोकादायक बाब म्हणजे, वाऱ्याने वा पाण्यामुळे किनाऱ्यावरील रेती बाजूला झाली की हे मृतदेह पुन्हा उघड्यावर येत आहेत. या मृतदेहांना खाण्यासाठी मग परिसरातील भटकी कुत्री आणि पक्षी याठिकाणी येत आहेत. हे सर्व मृतदेह कोरोना रुग्णांचे आहेत की नाही हे नक्की नसले, तरी अशा प्रकारे मृतदेहांची होणारी विटंबना आणि त्यातून आजार परसण्याची भीती आहेच. एकीकडे यूपी सरकार कोरोना रुग्ण कमी झाल्याचे सांगत असताना; घाटांवरील ही दृश्ये मात्र दुसरीच गोष्ट सांगत आहेत...