नैनितालमधील आकर्षक आणि मजबूत भूकंपरोधक नैसर्गिक घरे!
नैनिताल : गेल्या काही वर्षांत मानवाने ज्या नैसर्गिक आपत्ती सहन केल्या. त्यापैकी मोठी आपत्ती म्हणजे भूकंप. जो काही सेकंदमध्ये सर्व काही नष्ट करू शकतो. त्यामुळे जगात अशा घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जी दिसायला सुंदर आणि आकर्षक असतील. तसेच त्यात भूकंप सहन करण्याची क्षमता असेल. असाच एक प्रयत्न सरोवर नगरी नैनितालमध्ये करण्यात आला आहे. नैनितालमधील मेहरोडा गावात पोहोचलेल्या शगुन यांनी केवळ माती आणि लाकडाच्या मदतीने ही भूकंपरोधक घरे बनवली आहेत. ही घरं जितकी आकर्षक आहेत. तितकीच मजबूत देखील आहेत.