हरियाणातील 'मिनी ब्राझील'; इथल्या 200 मुली आहेत फुटबॉलच्या नॅशनल चॅम्पियन! - हरियाणा अलखपूरा मिनी ब्राझील
चंदिगढ : फुटबॉल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ब्राझील देश! असं म्हणतात, की ब्राझीलच्या प्रत्येक घरात एक फुटबॉलपटू जन्माला येतो. भारताच्या हरियाणामधील भिवानी जिल्ह्यात असं एक गाव आहे, जिथला प्रत्येक रहिवासी फुटबॉल खेलतो. अलखपुरा नावाच्या या गावातील मुली, कित्येक अडथळे आणि अडचणींचा सामना करत, फुटबॉलच्या मदतीने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरत आहेत.