पाहा अनेकदा सर्पदंश झालेल्या चित्तोडगढच्या विषकन्येची ही कहानी
चित्तोडगढ (राजस्थान) - सापाचं नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहतो. कारण विषारी साप चावल्यास वाचण्याची संधी तशी कमीच असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला राजस्थानच्या चित्तोडगडमधील एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत. जिला अनेकवेळा सर्पदंश झालाय. बृजबाला तिवारी असं या महिलेचं नाव आहे. ती महिला व बालविकास विभागात ग्रामसाथी म्हणून गेल्या 45 वर्षांपासून कार्यरत आहे. तिचं आज स्वत:चं घर असलं तरी, 1993 मध्ये ती आपल्या कुटुंबीयांसह मातीच्या घरात राहायची. एकदा तिला साप चावला आणि पती कृष्ण दत्त तिवारीसह परिवारातील लोक घाबरले आणि तिला तत्काळा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला वर्ष 2000 पर्यंत शेजारचे लोकचं दवाखान्यात घेऊन जायचे. मात्र कालांतराने विषाचा परिणाम तिच्यावर कमी होऊ लागला. वाचा हा स्पेशल रिपोर्ट...