Wrestler Bala Rafiq : महाराष्ट्र केसरी स्पर्धा जाहीर होताच कुस्तीपटूंमध्ये आनंद ; पहा काय म्हणाला महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक - Maharashtra Wrestling Competition at Satara
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे ( Maharashtra Kesari Wrestling Tournament ) यजमानपद यंदा साताऱ्याला मिळाले आहे. येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं ( Maharashtra Wrestling Council ) स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले नव्हते. अशातच यंदा या स्पर्धेच्या आयोजनामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे.मागील दोन वर्षात पैलवानांना खूप अडीअडचणीना सामोरे जावं लागलं आहे. दोन ते तीन वर्षांपासून मैदानी कुस्ती झालेली नाही. त्यात आत्ता महाराष्ट्र केसरीची घोषणा झाल्याने आनंद आहे.पण प्रॅक्टिस कमी झाली असल्याने अनेक पैलवानांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.अस देखील यावेळी काही पैलवानांनी सांगितलं आहे. यंदा माझा सराव हा मातीतून होत आहे. मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभाग घेणार आहे. सगळ्यांनी स्पर्धेची तयारी केली असून सगळेच चांगले स्पर्धक यंदा महाराष्ट्र केसरीमध्ये असणार आहेत. आणि यंदा स्पर्धा ही खूप चांगली होणार आहे, असं यावेळी 2018 महाराष्ट्र केसरी बाला रफिक ( Maharashtra Kesari Bala Rafik ) याने यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST