NCP Agitation Over Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन - जंगली महाराज रस्ता पुणे
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात ( NCP Agitation Over Silver Oak Attack ) आले. जंगली महाराज रस्त्यावरील ( Jungali Maharaj Road Pune ) झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आंदोलन झाले. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक ( Arrest Advocate Gunratna Sadawarte ) करावी अशी मागणी केली. तसेच सदर घटनेत भाजपाचा हात असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन