नवी दिल्ली :मन-शरीर शक्ती हे आपले शरीर कसे कार्य करतात या सर्व पैलूंवर नियंत्रण ठेवतात. यामध्ये आपले शरीर कसे दिसते, आपली पचनशक्ती किती शक्तिशाली आहे, आपले विचार आणि शब्द कसे प्रभावित होतात, यांचा समावेश होतो. आयुर्वेदाची तत्त्वे तुम्हाला तुमचा आहार अनुकूल करण्यास मदत करू शकतात, योग्य पचनास मदत होईल.
प्रक्रिया न केलेले पदार्थ खा :आयुर्वेदिक आहारात असे म्हटले आहे की, 'प्राण' वाढवणे हा शरीरातील जीवनशक्तीचा स्रोत असलेल्या 'ओजस' वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्राणाने समृद्ध असलेले अन्न थेट पृथ्वीवरून मिळते. त्यांचा प्राण हा सूर्य, पाणी आणि पृथ्वीच्या शक्तींच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता अशा संपूर्ण पदार्थांपैकी एक म्हणजे बदाम. आयुर्वेद बदामांना त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि वात संतुलित करण्याच्या क्षमतेसाठी उच्च मानतो. अन्न तयार करताना, बदाम एक शक्तिवर्धक आणि पौष्टिक पोषक उत्पादन (कार्यात्मक अन्न) म्हणून ओळखले जातात. प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणालींमध्ये औषधीय प्रभावांसह अनेक संयुग औषधी फॉर्म्युलेशनमध्ये देखील याचा उल्लेख आहे.
रात्रीहलकेजेवण करा :आयुर्वेदानुसार, तुम्ही तुमचे पोटभरून जेवण दुपारच्यावेळी जेवावे. झोपायच्या किमान तीन तास आधी हलके आणि घरी तयार केलेले खावे. रात्री 10:00 वाजता किंवा त्यापूर्वी झोपण्याचे ध्येय ठेवा. रात्री उशिरा आणि पोटभर जेवण केल्याने तुमच्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. प्रक्रिया न केलेले पदार्थ म्हणजे ते कच्चे किंवा नैसर्गिक स्वरूपात घेतले जातात. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये. हलके जेवण केल्याने पचनक्रियेला जास्त मेहनत करावी लागत नाही. मसालेदार जेवण रात्रीच्या आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. म्हणून रात्रीच्या जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावे.
70-30 नियमांचे पालन करा :आपल्या कुटुंबांमध्ये, आम्हाला आपल्या ताटातले सर्वकाही संपवायला शिकवले गेले आहे, परंतु आयुर्वेदानुसार, तुम्ही समाधानी होईपर्यंतच खावे. जास्त खाऊ नका. नेहमी आपल्या भूकेच्या 70 टक्के आहार घ्या जेणेकरुन पचन चालू राहणार. तुमचे पोट 70 टक्के भरले पाहिजे आणि 30 टक्के रिकामे असले पाहिजे, असा 70-30 नियम नेहमी पाळला पाहिजे. प्रमेहा स्थितीसाठी बदाम फायदेशीर ठरू शकतात.
हेही वाचा :हिवाळ्यात घ्या केसांची अशी काळजी; जाणून घ्या केसांचे आरोग्य वाढवण्यासाठी टिप्स आणि युक्त्या