हैदराबाद : पृथ्वीचा ७३ टक्के भाग पाण्याने व्यापल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही देशात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब वाचण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतात. पाणी वाचवून ते साठवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी युनोच्या वतीने दरवर्षी २२ मार्चला जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे या दिनी जगभरात पाण्याचा वापर जपून करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
काय आहे जलदिनाचा इतिहास :पर्यावरणाच्या विकासावर रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांची 1992 मध्ये परिषद झाली. या दिवशी जागतिक जल दिनाची कल्पना सूचवण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासभेने याबाबतचा ठराव मंजूर करुन दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने २२ मार्च हा जल दिन म्हणून घोषित केल्यानंतर 1993 पासून जागतिक जल दिन साजरा साजरा केला जातो. जल दिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रमाचे 1993 पासून आयोजन करण्यात येते. या दिवशी नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात येतात.