हैदराबाद :आरोग्य निरोगी ठेवायचे असेल, तर तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागतिक पातळीवर २० मार्चला जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील नागरिकांमध्ये मौखिक आरोग्याच्या गरजेबद्दल जागरूकता पसरविण्याच्या हा दिवस साजरा करण्यात येतो.
तोंडातील संसर्ग पसरतो शरीरात :आपले शरीर निरोगी ठेवण्यात आपल्या तोंडाचे आरोग्य खूप मोठी भूमिका बजावते. आपण जे काही खातो ते तोंडातून आपल्या शरीरात पोहोचते. अशा वेळी जर आपल्या तोंडात कोणत्याही कारणाने संसर्ग झाला असेल तर तो आपल्या तोंडातून शरीरात प्रवेश करतो. त्यासह अन्न देखील दूषित होऊ शकते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. दात आणि तोंडाची नियमित स्वच्छता अनेक रोगांपासून वाचवू शकते. अशा स्थितीत मौखिक आरोग्य राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरगजेचे आहे. नागरिकांना तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 20 मार्चला जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
काय आहे जागतिक मौखिक आरोग्य दिनाचा इतिहास :२० मार्च दिवस 2007 या दिवशी प्रथमच नागरिकांमध्ये मौखिक आरोग्य आणि मौखिक स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एफडीआयचे संस्थापक डॉ. चार्ल्स गोडोन यांच्या स्मरणार्थ 12 सप्टेंबरला जागतिक दंत महासंघाने (FDI) 2007 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा केला. परंतु 2013 मध्ये हा कार्यक्रम साजरा करण्याची तारीख बदलून 20 मार्च करण्यात आली. तेव्हापासून 20 मार्च हा दिवस वेगवेगळ्या थीमवर जगभरात साजरा केला जातो.
काय आहे यावर्षीची थीम :यावर्षी जागतिक मौखिक आरोग्य दिन 2023 मोहीम 'तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा' या थीमसह साजरा केला जात आहे. ज्या अंतर्गत सर्व नागरिकांना त्यांच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांचे स्मितहास्य आयुष्यभर चांगले राखले जावे हा त्यामागचा हेतू आहे. जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जगभरातील दंत संस्था मोफत दंत तपासणी शिबिरे, परिसंवाद, चर्चा आणि मौखिक आरोग्याशी संबंधित इतर कार्यक्रम आयोजित करत आहेत. यावेळी विविध आयोजक #WorldOralHealthDay, #WOHD23, #MouthProudChallenge किंवा #GoMouthProud सोबत सोशल मीडियावर जागरूकता संदेश पसरवण्याचे आणि व्हिडिओ अपलोड करण्याचे आवाहन देखील करत आहेत.
का आहे महत्वाचे निरोगी मौखिक आरोग्य :ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत तोंडात किमान 20 दात असले पाहिजेत. याचा परिणाम त्यांच्या मौखिक आरोग्यावर होतो. तर लहान मुलाच्या तोंडात 20 दात असतात. खरे तर निरोगी हिरड्या, मजबूत दात, तटस्थ श्वास आणि स्वच्छ जीभ ही उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत. पण काही वेळा या समस्यांमुळे शारीरिक आजार होतो.
दुर्लक्ष केल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका :मौखिक आरोग्य हा एक अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. बहुतेक लोक दात किंवा तोंडाशी संबंधित समस्यांबद्दल चर्चा किंवा लक्ष देत नाहीत. त्यामुळे आजही मोठ्या संख्येने लोक तोंडाची स्वच्छता राखत नसल्याने आजारांना बळी पडतात. मौखिक आरोग्याची आकडेवारी मोठी भीतीदायक आहे. तोंडाच्या आजारांमुळे जगभरात 3.5 अब्ज नागरिक बाधित होतात. त्यापैकी 90 टक्के दात किडण्याशी संबंधित आहेत. त्याचवेळी 530 दशलक्षाहून अधिक मुलांना दुधाचे दात किडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त हिरड्यांचा आजार जगभरातील 50 टक्के नागरिकांचे दात खराब करतो. त्यामुळे कधी कधी तोंडाचा कर्करोगही होऊ शकतो. तोंडाचा कर्करोग हा जगभरातील 10 सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक मानला जातो. जगभरात दरवर्षी अंदाजे 3 ते 7 लाख नवीन रुग्ण आढळतात. दुसरीकडे भारतातील एकूण कर्करोगाच्या रूग्णांपैकी सुमारे 30 टक्के तोंडाच्या कर्करोगाचे रूग्ण आहेत. जागरूकतेच्या अभावामुळे सुमारे 70 टक्के नागरिक पाच वर्षांतून एकदाही दात तपासत नाहीत. त्याचवेळी 90 टक्के नागरिक दिवसातून एकदाच दात स्वच्छ करतात.
कशी घ्यावी काळजी
- तोंडाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.
- दिवसातून किमान दोनदा मऊ ब्रशने नियमितपणे दात स्वच्छ करा.
- आठवड्यातून 1-2 वेळा फ्लॉसिंग करा.
- हिरड्यांना नियमित मसाज करणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे तोंडातील रक्ताभिसरण सुधारते.
- शक्यतो ताजे आणि पचण्याजोगे अन्न खा. ज्यामध्ये ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि संपूर्ण धान्यांचा मुबलक प्रमाणात समावेश करावा.
- साखर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर राहा.
- अन्न चांगलं चावून खा. अन्न योग्य प्रकारे चघळल्याने, आवश्यक एन्झाईम्स तोंडात योग्यरित्या स्राव होतात. ते पचन प्रक्रिया निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
- पान मसाला, तंबाखू आणि गुटखा यांचे सेवन आणि धूम्रपान टाळा
- मद्यपानाचे सेवन मर्यादित करा
हेही वाचा - World Head Injury Awareness Day : डोक्याला होणारी किरकोळ दुखापतही ठरू शकते गंभीर; जाणून घ्या जागतिक डोके दुखापत जागरुकता दिवसाचे महत्त्व