हैदराबाद :प्रत्येकाला केक खायला आवडतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते मोठ्या उत्साहाने खातात. आनंदाच्या प्रसंगी केक कापण्याचे वेगळे महत्त्व आहे. विशेषत: मुलांना केक खायला खुप आवडतो. हिवाळ्यात तुम्ही अगदी घरच्या घरी हेल्दी केक्स बनवू शकता, जे सर्वांना आवडतील.
गाजराचा केक :
- साहित्य : गाजर- 2-3, अंडी- 2, मैदा- 2 वाट्या, चवीनुसार साखर, ऑलिव्ह ऑईल- 2 चमचे, व्हॅनिला इसेन्स, मीठ आणि बेकिंग पावडर- 1 टीस्पून.
- कृती : हे करण्यासाठी, प्रथम मायक्रोवेव्ह 180 अंशांवर प्रीहीट करा. आता गाजर, साखर, तेल, अंडी, व्हॅनिला इसेन्स मिक्स करा. यानंतर मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करून मिक्स करा. केकचे मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये घाला आणि 20-30 मिनिटे बेक करा.