महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

चांगले आरोग्य हवे आहे? वाचा ही श्वास घेण्याची तंत्रे - नाडी शोधन ईटीव्ही भारत

आपण श्वास घेत आहोत, याचा आर्थ आपण जीवंत आहोत. श्वास घेणे ही एक अशी प्रक्रिया आहे, जी व्यवस्थित केली तर ते बऱ्याच प्रमाणात आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करू शकते. त्यामुळेच, जगभरातील लोकं विविध प्रकारचे ध्यान करताना श्वास घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 21, 2021, 6:27 PM IST

Updated : Jul 22, 2021, 2:49 PM IST

दीर्घ श्वास घेणे, याला देखील ध्यान किंवा चिंतनाचा एक प्रमुख भाग मानला जातो. योगामध्ये देखील योग्य श्वास घेण्याच्या व्यायामाला सर्वात महत्वाचे मानले जाते. यासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध संशोधनांचे निकाल असे सांगतात की, ध्यान आणि योग्य तंत्राणे श्वास घेण्याची प्रक्रिया ही चिंता कमी करणे, स्मृती तीक्ष्ण करणे, औदासीन्यापासून आराम देणे, तसेच झोप चांगली होण्यास मदद करते.

वेगवेगळ्या देशांमध्ये आणि पंथांमध्ये श्वास घेण्याच्या भिन्न तंत्रांविषयी माहिती सांगण्यात आली आहे. जगभरात लोकप्रिय श्वासोच्छवासासंबंधी तंत्रांविषयी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' श्वसनक्रिया तज्ज्ञ व प्रशिक्षक आणि जैविक वेलनेसच्या प्रमुख नंदिता आणि योगाचार्य मीनू वर्मा यांच्याशी बातचीत केली. या तज्ज्ञांशी केलेल्या बातचीतच्या आधारावर आम्ही वेगवेगळे धर्म आणि पंथांमध्ये अवलंबल्या जात असलेल्या श्वसनक्रिया तंत्रांची माहिती तुमच्याशी शेअर करत आहोत.

कुंडलिनी (डायाफ्राम श्वसन)

योगात कुंडलिनी ध्यानाला विशेष महत्व दिले जाते. या व्यायामात, श्वासोच्छवासाच्या तंत्रांच्या माध्यमातून श्वासोच्छवासावर नियंत्रण करून शरीरात गतीशील ऊर्जा केंद्रित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हिंदू संस्कृतीत कुंडलिनीला 'गुंडाळलेला साप' (कुडलित साप) म्हणून संबोधित केले जाते. प्राचीन विश्वास आणि योग दर्शननुसार प्रत्येक व्यक्तीचा पाठीचा कणा त्याच्या शरीराच्या उर्जेला वाहून नेतो. कुंडलिनीत या उर्जेला जागृत करणे, चालू ठेवणे आणि अतिरिक्त व अनावश्यक ऊर्जा उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रियेत डायाफ्रामने श्वास घेण्यास निर्देशित केले जाते. महत्वाचे म्हणजे, डायाफ्राम स्नायू फुफ्फुसांच्या खाली स्थित आहे, आणि त्यास श्वास घेण्यासाठी सर्वात कार्यक्षम स्नायू मानले जाते. योग्य मार्गदर्शनात कुंडलिनीचा व्यायाम श्वासोच्छवासाच्या समस्येला कमी करण्याबरोबरच फुफ्फुसाच्या जुनाट रोगांनी ग्रस्त लोकांसाठी उपयुक्त ठरते.

कुंडलिनी

नाडी शोधन आणि प्राणायम

योगाचार्च मीनू वर्मा सांगतात की, प्राणायमाला योगात विशेष महत्व दिले जाते. या व्यायामात नाडी शोधनासाठी श्वासोच्छवासाच्या नियंत्रणाचा व्यायाम केला जातो. हे बऱ्याच प्रकारचे असते. डिसेंबर 2017 साली मेडिकल साइंस मॉनिटर बेसिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका आभ्यासातून देखील या प्रकारे श्वासोच्छवास घेण्याच्या नियमित व्यायामाने रक्तदाब कमी होतो आणि दक्षता वाढते, असे लक्षात आले आहे.

प्राणायम

शमथा शमता

या श्वासोच्छवासाच्या क्रियेस बैद्ध धर्मात विशेष महत्व दिले जाते. शमथा ज्याला इंग्रजीत माइंडफूलनेस असे म्हंटले जाते, हे एक लोकप्रिय बौद्ध ध्यान व्यायाम आहे, जे शांती आणि स्पष्टतेला विकसित करण्यावर केंद्रित आहे. उचित मार्गदर्शनात याच्या आभ्यासाने आंतरिक शांती प्राप्त होऊ शकते. एक अजून बौद्ध ध्यान विपश्यना (जागरूकता) याबरोबर जर हा व्यायाम केला तर ते गहन सखोल अंतर्दृष्टी आणि आध्यात्मिक प्रबोधन देऊ शकते.

जर्नल कॉग्निटिव्ह एन्हांसमेंटमध्ये मार्च 2018 मध्ये प्रकाशित एका आभ्यासात असे दिसून आले आहे की, शमथ तंत्रांचा सतत वापर ध्यानमध्ये सुधार करते आणि ते अंतर्दृष्टी, जागरूकता, एकाग्रता आणि स्मृतीला वाढवू शकते. शमथा ध्यानदरम्यान विपश्यना, निकिरेन, लविंग-काइंडनेस ध्यान आणि माइंडफूल ब्रिथिंग सहित अन्य प्रकारच्या ध्यानाचे आभ्यास देखील केले जाते, अशी माहिती माईंडफूलनेस आणि वेलनेस एक्सपर्ट नंदिता यांनी दिली.

शमथा

झुआंकी किंवा जुआंकी

ही एक ताओवादी ध्यान क्रिया आहे ज्यात प्रकृतीसोबत सामंजस्त साधण्यासाठी शरीर आणि मन शांत करण्यावर भर देण्यात येतो. हा ध्यान चीनी दर्शन आणि ताओ धर्माशी जोडलेल्या प्रथांवर आधारित आहे, ज्यात एकाग्रता, माइंडफूलनेस आणि चिंतनवर लक्ष दिले जाते. नंदिता सांगतात की, ताओवादी ध्यान ही ध्यान आभ्यासाची एक मालिका आहे, ज्यात मुख्यत्वे ताओच्या पद्धतीने मनाला प्रशिक्षित केले जाते. ताओवादी ध्यान साधरणत: श्वासोच्छवासाच्या प्रवाहावर केंद्रित असते. या ध्यानात बा गुआ झांग, ताओ यिन, 'गाईड अँड पूल' श्वासोच्छवासाचा व्यायाम, जान जुआंग 'स्टँडिंग लाईक ए पोस्ट' या तंत्राचा देखील आभ्यास केला जातो.

Last Updated : Jul 22, 2021, 2:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details