हैदराबाद - ‘साथीच्या रोगाला तोंड देत असताना, आपण आरोग्य सेवांमध्ये त्वरेने केलेले नवे बदल आणि काळजी घेण्याचे नवे तंत्र पाहिले. शिवाय आरोग्याची काळजी घेण्याची सुधारित पद्धतही पाहिल्या. या अनुभवातून आपण बरेच काही शिकायला हवे. 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे'च्या निमित्ताने (जागतिक आरोग्य संरक्षण दिन) हे संकट संपवण्याचे आणि आता आपल्या सर्वांचे संरक्षण करणार्या आरोग्य यंत्रणेत गुंतवणूक करून एक सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवण्यास वचनबद्ध होऊ या.’ संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस, अँटेनिओ गुटेरेस म्हणतात.
दरवर्षी १२ डिसेंबर रोजी 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे' साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने जगभरात प्रत्येक व्यक्तीला परवडेल आणि चांगल्या दर्जाची अशी आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे एकमताने प्रत्येक देशाला सांगितले. म्हणून हा दिवस युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे म्हणून साजरा होतो. संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेल्या सुधारित टिकाऊ विकास लक्ष्य (एसडीजी) मध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षीची थीम " सर्वांसाठी आरोग्य, प्रत्येकाचे संरक्षण " अशी आहे.
जागतिक आरोग्य संरक्षण (युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे) का?
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज हा विश्वास देते की कुठल्याही जात, पंथ, वंश, लिंग आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा मिळतात. मग त्यांची आर्थिक स्थिती कशीही असो, कितीही अडचणी असोत. निरोगी लोकसंख्येमुळे देश अधिक चांगल्या आर्थिक विकासाच्या मार्गावर जाईल. विशेषत: आता जागतिक महामारीला तोंड देत असताना, प्रत्येकाला समान आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हे आपण निश्चित केले पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाचा लोकसंख्येच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. शास्वत विकास आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. सामाजिक असमानता कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा महत्त्वाचा घटक ठरतो. हे जागतिक संरक्षण म्हणजे आपल्या नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी असलेली सरकारची बांधिलकी मानली जाते.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज कसे मिळवता येईल ?