नवी दिल्ली: आजकाल डेटींग करणे हे अत्यंत महागडे झाले आहे. 2021 मध्ये टिंडरने (tinder) आपल्या फ्यूचर ऑफ डेटिंग (future of dating) अहवालाद्वारे उघड केले की, जगभरातील सिंगल तरुण साध्या आणि सर्जनशील डेटींगला प्राधान्य देत आहेत. या वर्षी अनेक डेटिंग अॅप्सच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की त्यांचे सदस्य परवडणाऱ्या डेटींगकडे वळत आहेत. टिंडरच्या अनुसार तरूण डेटर्स पैकी 73 टक्के डेटर्स साध्या आणि स्वस्त डेटींगला प्राधान्य देत आहेत. तुम्हाला डेटींगला सुरुवात करण्यासाठी येथे काही प्रो टिप्स आहेत. (tips for Pocket Friendly Date).
निसर्गाच्या सानिध्यात लांब चालणे:समुद्रकिनारे आणि उद्याने सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तुमची पहिली डेट थोडी अधिक रोमँटिक बनवण्यासाठी तुम्ही काही स्वादिष्ट स्नॅक्ससह पार्कमध्ये किंवा समुद्राकिनाऱ्याजवळ संध्याकाळचा लांब फेरफटका मारू शकता. टिंडरने आपल्या युजर्सच्या बायोमध्ये 'लाँग वॉक'च्या उल्लेखांमध्ये दुपटीने वाढ झालेली पाहिली आहे.
स्ट्रीट फूड एक्सप्लोर करा:असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. तुमच्या पार्टनरसोबत स्थानिक चाट-स्टोअरमध्ये जा आणि चविष्ट, मसालेदार अशा स्ट्रीट फुडचा आनंद घ्या. 42 टक्के टिंडर सदस्यांनी शेअर केले आहे की त्यांना विविध ठिकाणच्या नवनवीन फूड जॉइंट्स पाहणे आवडते.
क्लासिक म्युझियम डेट:तुम्हीतुमची पहिली डेट तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच सर्जनशील बनवू शकता. जर तुम्हा दोघांनाही व्हिज्युअल आर्टमध्ये आवड असेल आणि भारताच्या समृद्ध इतिहासाबद्दल ओढ असेल, तर तुम्ही तुमची डेट एखाद्या म्युझियम मध्ये स्पेंड करू शकता. त्याचबरोबर डेटद्वारे तुमच्याजवळ असलेले ज्ञान आणि क्रियेटीव्हिटी सुद्धा पार्टनर सोबत शेअर करू शकता.