महाराष्ट्र

maharashtra

सुदृढ राहण्यासाठी निरोगी हृदय गरजेचे, त्यासाठी वाचा 'या' टीप्स

By

Published : Oct 17, 2021, 5:46 PM IST

गेल्या काही वर्षांत हृदयरोगींची संख्या वाढलीच आहे, परंतु कोविड संसर्गामुळे देखील लोकांनी हृदयाशी संबंधित अनेक सस्यांचा सामना केला आहे. या पार्श्वभूमीवर चांगल्या आरोग्यासाठी हृदयाची काळजी घेण्याची गरज आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काही टीप्स देण्यात आल्या आहेत, ज्या फायदेशीर ठरू शकतात.

heart healthy
निरोगी हृदय

हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक आहे, ज्यात समस्या झाल्यास ते घातक ठरू शकते. कोरोना संकटातही हृदयरोगी हे कोरोनापासून असुरक्षित असल्याचे मानले गेले. केवळ एवढेच नव्हे तर, मागील काही काळात तारुण्यात वाढत असलेली हृदयरोगांची प्रकरणे विशेषत: हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने देखील लोकांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काही टीप्स देण्यात आल्या आहेत, ज्या फायदेशीर ठरू शकतात.

आकडे काय सांगतात?

हृदय रोगाला जगभरात होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणूनही ओळखले जाते. एका आकडेवारीनुसार, केवळ अमेरिकेत 11 टक्के पुरुष आणि 9 टक्के महिला हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतात देखील आरोग्य तज्ज्ञ याकडे एक मोठा धोका म्हणून पाहतात.

आकडेवारीनुसार, भारतात वर्ष 1990 पर्यंत हृदय रोगाने दरवर्षी 2.26 मिलियन (22.6 लाख) लोकांचा मृत्यू होत होता. आता चिंतेची बाब म्हणजे, हा आकडा वर्ष 2025 पर्यंत वाढून 5.23 मिलियन (52.3 लाख) होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, ग्रामीण लोकसंख्येत हृदय रोगाची प्रकरणे 1.6 वरून 7.4 टक्के, तर शहरी लोकसंख्येत 1 वरून 13.3 टक्के झाली आहेत.

बचाव कसा करावा?

डॉक्टर आणि तज्ज्ञ मानतात की, दम लागणे किंवा हृदयसंबंधी रोगांची लक्षणे पाहता जर आरोग्यात काही अस्वस्थता असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. त्याचबरोबर, नियमित आरोग्याची तपासणी देखील गरजेची आहे, कारण हृदयरोगाबाबत सुरुवातीलाच कळले तर, त्याचा उपचार आणि बरे होण्याची शक्यता अधिक वाढू शकते.

हृदयरोगासाठी अनेक कारणांना जबाबदार मानले जाते ज्यामध्ये अंसतुलित आहार, व्यायामात कमी किंवा शारीरिक शिथिलता आणि असंतुलित जीवनशैली प्रमुख मानली जाते.

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी पुढील टीप्स ठरू शकतात फायदेशीर

- जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी दिनचर्या स्वीकारा.

- संतुलित आणि वेळेत जेवण करा. अधिक तेल आणि मसालेदार जेवण करणे टाळा. अधिक चर्बीयुक्त जेवण खालल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. कोलेस्टेरॉल हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होऊन अडथळे निर्माण करतो.

- शक्यतो सायंकाळी 6 किंवा 7 नंतर काही खाण्याचे टाळा. त्याचबरोबर, सकाळी अधिक प्रोटीन व फाइबरयुक्त जेवण करा. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन फायदेशीर असते.

- निरोगी शरीरासाठी व्यायामही आवश्यक आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी कार्डिओ एक्सरसाईजला चांगले मानले जाते. रोज कमीत कमी 40 मिनिटे ब्रिस्क वॉक करा. त्याचबरोबर, स्विमिंग, दोरीवरच्या उड्या (Jumping rope), पळणे आणि साईकलिंग करणे यांसारख्या एक्सरसाईज देखील फायदेशीर असतात.

हेही वाचा -'मी टाईम' तणाव कमी करू शकतो, वाचा काय आहे ते...

ABOUT THE AUTHOR

...view details