महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Traumatic Childhood : बालपण दु:खात जगलेली मुले होतात अधिक रागीट आणि क्रूर - नेदरलँड

मुलांच्या बालमनावर जितके जास्त आघात झाले, तितके ते मोठेपणी रागीट होत असल्याचा दावा संशोधनातून करण्यात आला आहे. याबाबतचे संशोधन नेदरलँड येथील लेडेन विद्यापीठाचे संशोधक निएंके डी ब्लेस यांनी केले आहे.

Traumatic Childhood
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 27, 2023, 3:00 PM IST

वॉशिंग्टन :मुलांनी बालपण नैराश्यासह तणावात घालवल्यास ही मुले पुढे अत्यंत रागीट आणि क्रूर माणूस म्हणून वागत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. त्यांच्या बालमनावर जितका जबर आघात झाला असेल, तितके ते क्रूर आणि रागीट होत असल्याचेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे. या बालकांच्या मानसिक आरोग्यावर जोरदार परिणाम होतो. त्यामुळे नैराश्य आणि चिंतांवर उपचार करणे अधिक आव्हानात्मक असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे संशोधन पॅरिसमधील युरोपियन काँग्रेस ऑफ सायकियाट्रीमध्ये सादर करण्यात आले आहे.

नैराश्यापेक्षाही रागाचा धोका अधिक :या अगोदरच्या संशोधनात चिंता आणि नैराश्य या दोन्हींपैकी ४० टक्केपेक्षा जास्त रुग्णांना रागाचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ 5 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या नियंत्रणामध्ये आहे. अनेक वर्षांपासून नैराश्य आणि चिंतेच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नेदरलँड्सच्या संशोधकांचा अभ्यास तयार करण्यात आला होता. तोच वर्तमान अभ्यासासाठी डेटा प्रदान करत असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.

बालपणातील दुखापतीचा आहे इतिहास :नेदरलँड येथील लेडेन विद्यापीठाचे संशोधक निएंके डी ब्लेस यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. 2004 च्या सुरुवातीला या संशोधनात 18 ते 65 वयोगटातील सहभागींना घेतले. त्यात त्यांच्या बालपणाबद्दल त्यांना प्रश्न विचारले गेले. यातील 2 हजार 276 नागरिकांनी यात भाग घेतला होता. काही वर्षांच्या कालावधीत काम केल्याने ते शोधण्यात संशोधकांना यश आले. यात बालपणातील दुखापतीचा इतिहास असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यात पालकांचा घटस्फोट किंवा काळजी घेणे. त्यांनी सहभागींना दुर्लक्ष, भावनिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबद्दल देखील विचारल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

रागाची प्रवृत्ती कशी प्रकट होते :या सहभागींना नैराश्य आणि चिंतेशी संबंधित विविध मानसिक लक्षणांसाठी देखील तपासण्यात आले. यात त्यांची रागाची प्रवृत्ती कशी प्रकट होते, यावर संशोधन करण्यात आले. यावेळी संशोधक निएंके डी ब्लेस यांनी रागावर थोडे संशोधन झाले असून नेदरलँड्स स्टडी ऑफ डिप्रेशन आणि एंग्झायटी यांचे यावर संशोधन आहे. हा खूप चांगला वैज्ञानिक डेटा तयार झाला आहे. मात्र बालपणातील आघाताचा रागाशी संबंध असल्याबाबत यात संशोधन झाले नसल्याची माहिती या संशोधनाचे संशोधक निएंके डी ब्लेस यांनी दिली. आम्ही केलेल्या संशोधनातून ते स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.

बालपणात जितका त्रास जास्त तितका राग जास्त :बालपणात झालेल्या त्रासामुळे अनेकजण त्यांच्या मोठेपणी अदिक रागीट होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यात संशोधनात भावनिक दुर्लक्ष, शारीरिक किंवा मानसिक शोषणाचा इतिहास आहे. त्या लोकांमध्ये राग येण्याची शक्यता 1.3 ते 2 पट अधिक असल्याचे या संशोधनात आढळल्याचा दावा केला आहे. बालपणातील अनुभव जितका अधिक क्लेशकारक असेल तितका प्रौढ रागाकडे कल वाढत असल्याचेही संशोधक निएंके डी ब्लेस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या आघातामुळेच राग येतो असे आम्ही निश्चितपणे म्हणू शकत नाही, परंतु त्याचा संबंध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Covid During Pregnancy : कोरोना संसर्गाने बाधित गरोदर मातेच्या मुलाला होतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आजाराचा धोका

ABOUT THE AUTHOR

...view details