हैदराबाद :लवकरच सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, महिलांना इच्छा असते की त्यांची त्वचा नेहमीच चमकदार राहावी. सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा निस्तेज होते. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी महिला विविध रसायनांवर आधारित सौंदर्य उत्पादनं वापरतात. मात्र, प्रत्येक वेळी अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पण ग्रीन टी वापरून तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता. ग्रीन टी फेस पॅक घरी कसा तयार करायचा ते येथे जाणून घ्या.
ग्रीन टी फेस पॅक कसा बनवायचा:
मुलतानी माती आणि ग्रीन टी फेस पॅक : तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी माती खूप फायदेशीर मानली जाते. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये २ चमचे ग्रीन टी टाका, नीट मिसळा आणि पेस्ट तयार करा. यानंतर, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 ते 20 मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर थंड पाण्यानं धुवावे.