महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

डासांना पळवून लावण्यासाठी 'या' वनस्पती ठरू शकतात फायदेशीर - Mosquito repellent plant Neem

पावसाळा हा कीटकजन्य रोग घेऊन येतो. या मोसमात डासांमुळे होणाऱ्या आजाराचाही प्रादुर्भाव वाढतो. म्हणून डासांना जगण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण होऊ देता कामा नये. यासाठी आपले परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. डासांना आपल्यापासून दूर ठेवण्यात डास प्रतिबंधक वनस्पतींची देखील मदत होऊ शकते. या वनस्पतींबाबत आज आपण जाणून घेऊया.

mosquito repellent plants information Etv bharat
डासांपासून बचाव वनस्पती माहिती

By

Published : Oct 5, 2021, 8:12 PM IST

दरवर्षी अनेक लोक डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी आजारांनी आजारी पडतात. डासांपासून, कीटकांपासून बचाव करण्यासाठी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत जसे, लोशन, स्प्रे आणि अगरबत्ती. ही उत्पादने जरी त्यांचा हेतू पूर्ण करू शकत असले, तरी ते विविध प्रकारे हानिकारक असू शकतात. तथापि, या उत्पादनांव्यतिरिक्त इतर उपायांचा विचार केल्यास वनस्पती हा सर्वोत्तम पर्याय आहे. काही वनस्पती या डासांना दूर ठेवण्यास सक्षम आहेत.

या वनस्पतींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभव'च्या टीमने वनस्पतिशास्त्रज्ज्ञ पी.सी पंत यांच्याशी बातचित केली. पंत यांनी काही अशा वनस्पतींबाबत माहिती दिली जी दरवाज्याजवळ, बालकनीमध्ये किंवा बागेत लावल्यास डासांना दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

1) तुळशी

तुळशी ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. ती पर्यावरण देखील शुद्ध करते. पी.सी पंत सांगतात की, तुळशी ही डासांना दूर ठेवण्याबरबोरच डास चावलेल्या ठिकाणी तिच्या पानांमधून काढलेला रस लावल्यास खूप आराम मिळू शकते.

2) कडुनिंब

कडुनिंबामध्ये डासांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. या झाडाला घराबाहेर लावल्यास घरात घुसणाऱ्या डासांची संख्या कमी होऊ शकते. अनेक डास प्रतिबंधक उत्पादने कडुनिंबाचा सक्रिय घटक म्हणून वापर करतात, यातून कडुनिंबाची क्षमता लक्षात येते.

3) रोझमेरी

रोझमेरी फुलांचा सुगंध देखील डासांना दूर करतो. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी रोझमेरीची फुले पाण्यात भिजवून त्याची सर्वंत्र फवारणी करणे फायदेशीर ठरू शकते.

4) सिट्रोनेला

डासांपासून संरक्षणासाठी सिट्रोनेला खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. त्याचा सुगंध डेंग्यू पसरवणाऱ्या डासांना देखील दूर ठेवण्यास मदत करते. कडुनिंबासारखे सिट्रोनेला देखील अनेक डास प्रतिबंधक उत्पादनांमध्ये वापरले जाते.

5) कॅटनिप

कॅटनिप ही पुदीना कुटुंबाशी संबंधित एक वनस्पती आहे. ती बारामाही जगणारी वनस्पती (perennial plant) असून ती ऊण आणि सावली दोन्हीमध्ये वाढते. ही वनस्पती पांढरी आणि लॅव्हेंडर रंगाची असते. एका संशोधनाच्या निकालात कॅटनिप ही डीईईटी (pesticide) पेक्षा 10 पट अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

6) अजेरॅटम

अजेरॅटम ही देखील डास आणि कीटकांपासून बचाव करणारी सर्वोत्तम वनस्पती मानली जाते. या वनस्पतीवर हलकी निळी आणि पांढरी फुले उगतात जी कौमारिन निर्माण करतात. कौमारिन हा एक प्रकारचा तिखट गंध आहे, जो डासांना दूर करण्यासाठी वापरला जातो.

7) लॅव्हेंडर

लॅव्हेंडर ऑईलचा वापर रसायनमुक्त डास प्रतिबंधक क्रीम, लोशन आणि इतर उत्पादने निर्माण करण्यासाठी होतो. डासांच्या आक्रमणापासून बचावासाठी तुम्ही ते बसण्याच्या ठिकाणी लावू शकता.

8) हॉर्समिंट

डासांना दूर करण्यासाठी हॉर्समिंट खूप फायद्याचे आहे. या बारामाही वनस्पतीला सहसा कोणत्याही प्रकारच्या काळजीची आवश्यकता नसते. या वनस्पतीला एक तिखट वास आहे. तिच्या तेलामध्ये असलेल्या थायमॉलमुळे तिच्यात अँटिफंगल आणि अँटिव्हायरल गुणधर्म देखील आहेत.

9) लेमन बाम

लेमन बाम एक इन्डोअर वनस्पती आहे. तिच्यातील पाणांमध्ये मोठ्या प्रमाणात सिट्रोनेला आढळते. या वनस्पतीचा देखील डास प्रतिबंधासाठी वापर केला जातो.

10) झेंडू (Marigold)

झेंडूचा तिखट वास डासांना दूर ठेवतो. ही वनस्पती बागेत किंवा बालकनीतील एका छोट्या भांड्यात अगदी सहज वाढवता येते.

हेही वाचा -टार्ट चेरी ज्यूसचे 'हे' फायदे चकित करणारे, जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details