जन्मजात हृदयविकार तसेच कोरोना झालेल्या लोकांना अतिदक्षता विभागात ( intensive care unit ) (ICU) उपचार आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. सर्वात गंभीर कोरोना आजाराचा धोका असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार ज्येष्ठ नागरिक होते.
जन्मजात हृदय दोषांचे अनेक प्रकार आहेत. हृदयाजवळील रक्तवाहिन्या जन्मापूर्वी सामान्यपणे विकसित होत नाहीत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका कॅरी डाउनिंग यांनी सांगितले की, "जन्मजात हृदय दोष असलेल्या आणि नसलेल्या कोरोनाची तुलना करणारा डेटा मर्यादित आहे."
खालील गोष्टींची केली चाचपणी
संशोधकांनी प्रीमियर हेल्थकेअर डेटाबेस कोरोना रिलीझमध्ये गोळा केलेल्या मार्च 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांची तपासणी केली. यूएसमधील सर्व हॉस्पिटलायझेशनपैकी 20 टक्के लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. या कालावधीत डेटाबेसमध्ये 1 ते 64 वर्षे वयोगटातील 235,000 पेक्षा जास्त रुग्ण होते.रुग्णांना दोन गटांमध्ये विभागले गेले: ज्यांना जन्मजात हृदय दोष होता. आणि काहींना नव्हता. संशोधकांनी किती जणांना कोरोना झाला आहे. तसेच किती लोकांना श्वासोच्छवासास मदत करण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. याची चाचपणी केली.