हैदराबाद :आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याबाबत वारंवार सूचना दिलेल्या आहेत. आता तर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायला केवळ ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर लवकर ते लिंक करा, अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाच्या वतीने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च ही दिलेली आहे.
काय होईल नुकसान : आयकर विभागाने आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख वाढवून दिलेली आहे. या तारखेनंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याचेही आयकर विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे जर आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नाही, तर आपले कार्ड ३१ मार्चनंतर रद्द करण्यात येईल. त्यानंतर आपण बँकेत खाते उघडणे, म्युच्युअल फंड आणि स्टॉक एक्सचेंजमध्येही खाते उघडण्यास अपात्र ठरणार असल्याचेही आयकर विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रद्द केलेले कार्ड वापरल्यास होऊ शकतो दंड :आयकर विभागाच्या वतीने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याबाबत वारंवार जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र काही ग्राहकांनी अद्यापही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केलेले नाही. त्यामुळे आयकर विभागाने पॅन कार्ड रद्द केल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातही रद्द केलेले पॅन कार्ड वापरल्यास आयकर विभागाकडून मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न करणे मोठ्या महागात पडू शकते. त्यामुळे लगेच आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करुन घ्या आणि होण्याऱ्या नुकसानीला टाळा.