हैदराबाद : देशात धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धूम्रपानामुळे फक्त धूम्रपान करणाऱ्याच नाही, तर त्यांच्या आजूबाजुला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धूम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जागरूकता करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिवस साजरा केला जातो. यावर्षी ८ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
काय आहे धूम्रपान निषेध दिनाची थीम :धूम्रपानाच्या व्यसनामुळे आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. केवळ धूम्रपान करणारे नागरिकच नाही, तर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणाऱ्या नागरिकांनाही यामुळे त्रास सहन करावा लागतो. जे नागरिक धूम्रपान करतात त्यांच्याही आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो. यावर्षी ८ मार्चला 'आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको' ही थीम घेऊन धूम्रपान निषेध दिन साजरा करण्यात येत आहे.
जगातील १२५ देशांमध्ये होते तंबाखूचे उत्पादन :जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील १२५ देशांमध्ये तंबाखूचे उत्पादन होते. दरवर्षी जगभरात ५.५ ट्रिलियन सिगारेट तयार होतात. त्याचवेळी जगभरात एक अब्जाहून अधिक नागरिक धूम्रपानासाठी त्याचा वापर करतात असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूसाठी धूम्रपान हेच सर्वात मोठे जबाबदार असल्याचे 2021 मध्ये द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात उघड झाले आहे.
भारतातील २५ कोटी नागरिकांना धूम्रपानाचा विळखा :दरवर्षी संपूर्ण जगात 50 लाखांहून अधिक लोक धूम्रपानामुळे आपला जीव गमावत असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावले उचलली नाहीत तर 2030 सालापर्यंत धूम्रपानामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या दरवर्षी 80 लाखांच्या पुढे जाईल, अशी भीतीही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. केवळ धूम्रपानामुळेच नाही तर तंबाखूच्या संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे 5 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील एकूण धूम्रपान करणार्यांपैकी सुमारे 10 टक्के भारतात आहेत. भारतात सुमारे २५ कोटी नागरिक गुटखा, बिडी, सिगारेट, हुक्का इत्यादीद्वारे धूम्रपान करत असल्याचेही या अहवालातून उघड झाले आहे.
धूम्रपान निषेध दिवसाचा इतिहास :ब्रिटनमध्ये 1984 मध्ये तंबाखूपासून होणार्या आजारांबाबत नागरिकांना जागृत करण्याच्या उद्देशाने धूम्रपान निषेध दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. नो स्मोकिंग डे जरी ब्रिटनमध्ये सुरू झाला असला, तरी त्याची गरज लक्षात घेऊन सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये तो साजरा केला जात आहे.
धूम्रपानामुळे होणारे नुकसान :तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा हानिकारक घटक आढळतो. त्यामुळे व्यसनाधीनता तर वाढतेच, शिवाय शरीराचेही खूप नुकसान होते. एकदा धूम्रपानाच्या विळख्यात अडकले, की तो विळखा सोडवणे फार कठीण असते. त्याचवेळी त्याचे पुनर्वसनाची प्रक्रिया देखील खूप त्रासदायक आहे. सिगारेट किंवा हुक्का आदी धूम्रपानामुळे तंबाखूच्या धुराच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनाही अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना दमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार आदी कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्याचवेळी बऱ्याच गंभीर रोगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते.
हेही वाचा - Women Take Care Of Herself : कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांनी अशी घ्यावी आरोग्याची काळजी ; अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम