हैदराबाद: मायग्रेनमुळे अत्यंत वेदनादायी अनुभव येतात. ही मेंदूची गंभीर स्थिती असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून मायग्रेनला जागतिक स्तरावर सूचीबद्ध करण्यात आले आहे. मायग्रेनचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या संपूर्ण दिनचर्येवर होतो. एकीकडे डोकेदुखी, उलटी, मळमळ इत्यादी त्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. मायग्रेन हा एक जुना विकार असल्याने वेदनांचे उपचार आणि व्यवस्थापन याबद्दल पीडितांना जागृत करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणीतरी मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असेल, तर तुम्ही या टिप्सच्या मदतीने त्यांना आराम देऊ शकता.
मायग्रेनच्या वेदना दरम्यान या टिप्स फॉलो करा :
- शांत वातावरण शोधा :मायग्रेनच्या पहिल्या लक्षणावर, विश्रांती घ्या. शक्य असल्यास तुम्ही जे काही काम करत आहात त्यापासून दूर जा. शांत रहा.
- लाईट बंद करा : जर तुम्हाला मायग्रेनचा झटका आला असेल तर दिवे बंद करा, कारण प्रकाशामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अशा स्थितीत अंधाऱ्या, शांत खोलीत विश्रांती घ्या आणि शक्य असल्यास झोपी जा.
- कॉम्प्रेस करा : जर तुम्हाला मायग्रेनचा झटका आला असेल तर तुमच्या डोक्याला किंवा मानेला गरम किंवा थंड कॉम्प्रेस लावा. आइस पॅकचा परिणाम वेदनांचे क्षेत्र सुन्न करेल, तर गरम पॅक तणावग्रस्त स्नायूंना आराम करण्यास मदत करू शकते.
- कॉफी प्या : मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी एक कप कॉफी प्या. केवळ कॅफिनमुळेच मायग्रेन संपुष्टात येऊ शकतो. परंतू खूप जास्त कॅफिन टाळा.
- चांगली झोप घ्या : मायग्रेन बहुतेकदा रात्रीच्या खराब झोपेमुळे होतात, म्हणून रात्रीची झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे. झोपेची वेळ नियमित ठेवा आणि वेळेवर झोपी जा. दिवसभरात ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ डुलकी घेणे टाळा. ऑफिसचे काम बेडरूममध्ये करणे किंवा बेडरूममध्ये टीव्ही पाहणे टाळा.
- आरोग्याला पोषक अन्न खा : प्रक्रिया केलेले मांस, जुने चीज, चॉकलेट्स, कृत्रिम गोड पदार्थ, एमएसजी असलेले खाद्यपदार्थ टाळा. कोणत्याही परिस्थितीत आपले जेवण वगळण्याचा प्रयत्न करू नका. निरोगी वजन राखा.आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.