हैदराबाद : तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients for making Tila Laddu) :तीळ - 200 ग्रॅम, गूळ - 200 ग्रॅम, बदाम - 5-6, काजू - 7-8, तूप - 50 ग्रॅम, वेलची - 4-5, सजवण्यासाठी थोड्या प्रमाणात पिस्ता.
तिळाच्या लाडूची रेसिपी(Til Laddu Recipe) : तीळ नीट स्वच्छ करून घ्या. पॅन गरम करा. त्यानंतर तीळ पॅनमध्ये टाका. नंतर मध्यम आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा आणि तीळ हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या. भाजलेल्या तिळातून अर्धे तीळ काढून हलके कुस्करून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये हलकेसे बारीक करावे.
गूळ आणि तिळाचे लाडू बनवण्याचे मिश्रण तयार आहे : एका कढईत चमचाभर तूप गरम करून त्यात गुळाचे तुकडे टाका आणि अगदी मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गूळ वितळला की, लगेच गॅस बंद करा. गूळामध्ये भाजलेले तीळ घाला. नंतर त्यात काजू, बदाम आणि वेलची पावडर मिसळा. गूळ आणि तिळाचे लाडू बनवण्याचे मिश्रण तयार आहे. एका प्लेटमध्ये पॅनमधून काढा आणि थोडा थंड होऊ द्या. लगेचच लाडू बनवायला (Make Healthy Sesame Laddu) घ्या. लाडू छान गोल आकारात बनवा म्हणजे ते दिसायला पण छान दिसतील. लाडूवर पिस्ता लावा आणि तुमच्या परिवाराला खायला द्या.