हैदराबाद : महाराणा प्रताप हे थोर भारतीय लढाऊ योद्धा होऊन गेले आहेत. त्यांच्या शौर्याचा प्रताप इतका जबरदस्त होता, की महाराणा प्रताप रणांगणांत असल्यानंतर दुश्मन चळाचळा कापत असायचे. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 मध्ये राजपूत सिसोदिया वंशात झाला. मात्र त्यांची जयंती हिंदू कॅलेंडरप्रमाणे साजरी करण्यात येते. महाराणा प्रताप यांचा जन्म हिंदू कॅलेंडरप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल तृतीयेच्या दिवशी झाला आहे.
महाराणा प्रताप यांचे कुटुंब : महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव महाराणा उदय सिंह आणि आईचे नाव जीवन कंवर असे होते. महाराणा प्रताप हे राणा संगाचे नातू होते. महाराणा प्रताप यांना लहानपणी सर्वजण कीका नावाने हाक मारत होते. राजपुताना राज्यांमध्ये मेवाडचे एक विशेष स्थान असून यामध्ये मेवाडला मोठा ऐतिहासिक गौरव प्राप्त झाला आहे. बाप्पा रावल, खुमान पहिला, महाराणा हमीर, महाराणा कुंभ, महाराणा संगा, उदय सिंह आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा मेवाडच्या राजघराण्यात जन्म झाला आहे.
दिल्लीचा बादशहा आणि महाराणा प्रताप :महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळात दिल्लीत मुघल सम्राट अकबराचे राज्य होते. अकबराला भारतातील सर्व राज्यांना अंकित करून मुघल साम्राज्याची स्थापना करायची होती. अकबरला संपूर्ण भारतावर इस्लामी ध्वज फडकवायचे मनसुबे होते. 30 वर्षे सतत प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी अकबराची अधिनता स्वीकारली नाही. त्यामुळे दिल्लीचा बादशहा महाराणा प्रताप यांच्यावर मोठा क्रोधित होता. महाराणा प्रताप यांनी शपथ घेऊन अकबरांना कधीही त्यांचा बादशहा मानणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र तरीही अकबराने महाराणा प्रताप यांना समजवण्यासाठी चार वेळा शांतीदूत पाठवून प्रयत्न केला. मात्र महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रस्ताव नाकारला होता.