महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

स्तनपान देताना तुमच्या भावना जाणून घ्या - पालकत्व निभावताना

मुंबईच्या बोरिवली इथल्या प्रफुल्ता सायकॉलॉजिकल वेलनेस सेंटर मधील करियर समुपदेशक आणि  माइंडसाइट, माइंडार्ट, कॉफी कनर्व्हरसेशन्सच्या मानसशास्त्रज्ञ आणि प्ले थेरपिस्ट काजल दवे यांच्याशी ई टीव्ही भारत सुखीभवच्या टीमने बातचीत केली. त्यावेळी त्यांनी काही टिप्स दिल्या.

breastfeeding
स्तनपान

By

Published : Aug 15, 2020, 1:09 PM IST

हैदराबाद - प्रत्येक आईसाठी स्तनपान देणे आणि नवा दिनक्रम हा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. नव्या दिनक्रमाचे पालन करावे लागते आणि अनेकदा ते खूप अपेक्षा ठेवणारे असते. तेव्हा अशा वेळी आई काय करते आणि तिने काय करायला हवे, यासाठी वयस्कर लोकांची चांगली मदत होते. मात्र, हल्ली कुटुंबे छोटी असल्याने स्त्रीला बऱ्याचदा बाहेरून व्यावसायिक मदत घ्यावी लागते.

बाळाला जन्म दिल्यानंतर दोन्ही पालक विविध भावनांचा अनुभव घेतात. पण आईमधल्या भावना स्पष्ट दिसतात. या भावना खूप भावना असतात. रोलर कोस्टरसारख्या. कधी आनंद तर कधी बाळाला कसे वाढवायचे आणि चांगले पालक कसे बनायचे याचा तणाव असतो. हे इतकेच नसते, तुमचा दिनक्रम हा पूर्णपणे बाळावर अवलंबून असतो. याचा परिणाम तुमचे मूड्स, पचनशक्ती आणि झोपेवर होतो. तर दुसरीकडे वडिलांनाही बाळाच्या कसे जवळ राहायचे, बाळाला कसे उचलायचे, बाळाशी जवळीक कशी साधता येईल, बाळ आणि पत्नी यांना कशी मदत करता येईल या सगळ्या काळज्या असतात. आईच्या झोपेची पद्धतही बदलली असते. तिला बाळाचे लंगोट किंवा डायपर बदलण्यासाठी उठावे लागते. नवा दिनक्रम आईच्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत मध्ये मध्ये उठून बाळाला स्तनपान देताना तिची झोप अपुरी होऊ शकते.

बाळाचा जन्म झाल्यानंतर आई एकदम भावनाप्रधान झाली असते. तिच्या मनात नव्या जिवाचे स्वागत करताना अपार आनंद असतो. पण मी बाळाची काळजी कशी घेऊ शकेन? मी चांगली आई आहे का?असे प्रश्नही तिच्या मनात सतत घोंघावत असतात. समजा डिलिव्हरी नाॅर्मल नसेल, तर तिला तिच्या आरोग्यासंबंधी अनेक त्रासाला तोंड द्यावे लागते. आईवर कुटुंब आणि बाळ अशी दोन्ही जबाबदारी असू शकते. वैवाहिक नाते कसे फुलवत ठेवायचे आणि त्याच वेळी बाळालाही तितकेच महत्त्व द्यायचे असे अनेक विचार तिच्या डोक्यात असतात. अशा परिस्थितीत स्वत:ची काळजी ही दुय्यम होते.

अशा प्रकारचे विचार आईच्या मनात सतत चालू असताना, हार्मोन्सही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. बाळाच्या जन्मानंतर मूड हार्मोन्समध्ये बदल होत राहतात. यामुळे तणाव, चिडचिड आणि चिंता जाणवत राहते. पण या हार्मोन्समुळे दूध स्रवण्यासही मदत होते.

जलद टिप्स

  1. बऱ्याचदा आपण म्हणतो, 'पालकत्व मॅन्युअल घेऊन येत नाही'. पण बाळ जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून आपण स्वत:ला बजावले पाहिजे, की पालकत्वाचा सुंदर प्रवास सुरू झाला आहे. तेव्हा पहिल्या दिवसापासूनच 'परिपूर्ण पालक' या विचारापासून स्वत: ला मुक्त करा. आणि असे करणे ठीकच आहे कारण तुम्ही तुमच्या मधल्या आणि आजूबाजूच्या यंत्रणेशी जुळवून घेत असता.
  2. पालकत्व हे कौशल्य आहे. याचा अर्थ ते शिकता येते आणि हेही समजून घ्या की तुम्हाला जे काही वाटत आहे, ते संप्रेरकाच्या होणाऱ्या बदलामुळे आणि रासायनिक बदलामुळे आहे. त्यामुळे स्वत: वर चिडणे किंवा स्वत:ला अपराधी वाटणे सोडून द्या. सारखी स्वत: ला आठवण देत राहा की तुम्ही तुमची सर्वोत्कृष्ट गोष्ट केली आहे आणि तुम्ही तुमच्या सर्वोत्तम असलेलेच करत राहणार. कारण तेच तुमच्या हातात आहे. हे लक्षात ठेवा की प्रत्येक मूल वेगळे असते.
  3. मानसशास्त्राच्या दृष्टीने स्तनपान हा आईपणातला सर्वात सुंदर अनुभव आहे. यामुळे आई आणि बाळ जवळ येते, एकमेकांबद्दल प्रेमभावना वाढते आणि सुरक्षिततेची भावनाही वाढते. स्तनपान दिल्याने आईचा मानसिक तणाव कमी होतो. बाळ मोठे होते तेव्हा तो किंवा ती समाधानी राहते आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करायची क्षमता त्यांच्यात वाढते.
  4. प्रसूतीनंतर आईमध्ये बरेच शारीरिक बदल होतात आणि वेगळे वाटणेही नैसर्गिक आहे. पण यामुळे जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधात असुरक्षितता वाटू शकते. पण तुमचे आणि तुमच्या जोडीदारातले बंध आणि संवाद ही तुम्ही कुठल्या मानसिक अवस्थेतून जाता हे त्याला कळण्याची गुरूकिल्ली आहे.
  5. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरचा काळ हा जोडीदाराबरोबरचे बंध घट्ट करण्यासाठी उत्तम असू शकतो. त्यामुळे पुढे आधारव्यवस्था तयार होण्यास मदत होते. तसेच भावनिक बंध सुधारतात आणि जबाबदारी शेअर केली जाते. यामुळे वडीलही बाळाला वाढवण्यात सहभागी होतात आणि आईला आराम मिळतो.
  6. भारतीय संस्कृतीत गरोदर स्त्रीला काही महिन्यांसाठी माहेरी पाठवले जाते. मानसिक दृष्ट्या स्त्रीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. तिथे ती कदाचित नेहमीपेक्षा निवांत राहू शकते. आता मात्र नोकरदार स्त्री आणि जबाबदारी वाटून घेणारा तिची जोडीदार असे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते. यामुळे आई आराम करू शकते, तिला चांगली सपोर्ट सिस्टिम मिळते, ती बाळाकडे संपूर्णपणे लक्ष देऊ शकते आणि शारीरिक, मानसिक ती पूर्वीसारखीच तंदुरुस्त होते. काही संस्कृतीत आई सासरीच राहते पण त्यांचे एकत्र कुटुंब असल्याने तेवढी मदत, आराम मिळतो. काळजी घेतली जाते.

तुम्ही तुमचे आरोग्य, सकस आहार आणि भावनात्मक गरजा याकडे नीट लक्ष पुरवलेत तर स्तनपान हे आनंददायी आणि प्रेमळ अनुभव बनवू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details