स्ट्रेस, सतत डोक्यात चालू असलेला विचारांचा गदारोळ, चिडचिडेपणा, भीती, आकांक्षा-अपेक्षांचे ओझे या आणि अशा अनेक कारणांनी मेंदू सतत बिझी राहतो आणि म्हणून थकतो. मानवी आरोग्यासाठी शांतता मिळणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. तसेच मानसिक आरोग्याची (Mental Health) काळजी घेणे तितकेचं महत्त्वाचे आहे. त्यामुळे ध्यान (Meditation) करणे खूप महत्त्वाचे समजल्या जाते.
Benefits of Meditation : जाणून घ्या, ध्यान केल्याचे 'हे' अनोखे फायदे - Prolactin Harmones
शहरामध्ये राहणाऱ्यांना आणि धकाधकीचे जीवन जगणाऱ्यांना शांतता मिळत नाही. मानवी आरोग्यासाठी शांतता मिळणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. ध्यानाने (Meditation) 'प्रोलॅक्टीन' (Prolactin Harmones) हॉर्मोन वाढते जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीचे कार्य सुरळीत ठेवते. जाणून घ्या, ध्यान केल्याचे 'हे' अनोखे (Benefits of Meditation) फायदे.
ध्यान केल्याचे फायदे:(Benefits of Meditation)हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा मार्ग आहे. ध्यानाने 'प्रोलॅक्टीन' हॉर्मोन (Prolactin Harmones) वाढते जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीचे कार्य सुरळीत ठेवते. ध्यानाने 'अँटीबॉडी टायटर' वाढतात. त्यामुळे रोगांवरचे उपाय आणि इलाज यांना आपले शरीर चांगल्याप्रकारे प्रतिसाद देऊ शकते. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो. ध्यानाने 'प्रोलॅक्टीन' हॉर्मोन वाढते जे आपल्या रोगप्रतिकार शक्तीचे कार्य सुरळीत ठेवते. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते. भावनिक लवचिकता वाढते. ध्यानाची खोली वाढत जाईल तसे मेंदूचे reconstruction होऊ लागते आणि शरीरात झालेल्या बिघाडांचे रिपेअरिंग व्हायला सुरू होते.
नियमित ध्यान करा:(meditate regularly)दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात. घाई करू नका:दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतं आहे का ते पाहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका. ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा:(Do physical activity)यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल. साथीदारांसह ध्यान करा: आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा. यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल. शांत परिसर:शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता. विचारांचे निरीक्षण करा:विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.