नवी दिल्ली : जगभरातील नागरिकांना गुजराती खाद्यपदार्थांनी भुरळ घातली आहे. गुजरातच्या तिखट, गोड आणि काहीसे मसालेदार पदार्थाची महतीची देशभरातही खमंग चर्चा होते. गुजराती पाककृती शाकाहारी खवय्यांना आनंद देणारी असून भाज्यांना सौम्य मसाल्यांसोबत बनवून तोंडाला पाणी आणणारे पदार्थ गुजराती खवय्ये बनवतात. त्यामुळे गुजरातच्या या खमंग पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही नक्की या पदार्थांचा आस्वाद घ्यायला हवा. तुमच्यासाठी खास काही गुजराती पदार्थांचे फोटो आम्ही येथे देत आहोत.
- खांडवी :गुजराती नागरिकांचा सुप्रसिद्ध नाश्ता म्हणून खांडवी ओळखली जाते. गुजराती स्नॅक्सपैकी एक असलेल्या खांडवीत कढीपत्ता, नारळ आणि मोहरी याच्या व्यतिरिक्त बेसन घालून खांडवी बनवले जाते.
- हांडवो : हा स्वादिष्ट पदार्थ तांदूळ, मसूर, धणे, ताक, मैदा यांचे सुवासिक मिश्रण वापरून बनवला जातो. ही डिश तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करता येते.
- पात्रा : आणखी एक स्वादिष्ट आणि कुरकुरीत टिपिकल गुजराती स्ट्रीट स्नॅक म्हणजे पात्रा. हा खांडवीसारखाच चाव्याच्या आकाराचा, गुंडाळलेला नाश्ता आहे. पात्रा हे जलद होणारा पदार्थ असून तो वाफेवर शिजवण्यात येतो. ही साधी पाककृती असून गुजरातच्या रस्त्यावर मिळते.
- दाबेली : दाबेली हा गुजराती रस्त्यावरील खाद्यपदार्थांपैकी एक आहे. दाबेलीचा आनंद केवळ गुजरात राज्यातच नाही तर संपूर्ण देशात घेतला जातो. दाबेलीचा सर्वात चांगला पैलू म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आवडीनुसार पारंपारिक डिश बनवू शकते. दाबेलीसह लसणाची गरम चटणी दाबेलीसह तुमच्या स्वादात भर घालते.
- फाफडा आणि जिलेबी :गुजराती नागरिक म्हणजे जिलेबी फाफडा हे समीकरण जुळलेले. त्यामुळे जिलेबीच्या चवीचा आस्वाद घेत त्यात फाफडा खाऊन स्वर्गीय सुखाचा आनंद घेता येतो. हे दोन स्नॅक्स सामान्यतः एकत्र मिसळले जाऊन जास्त प्रमाणात घेतले जातात. बेसन, हळद आणि वेलचीच्या बियांचा वापर फाफडा बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर लांब, कुरकुरीत पट्ट्यामध्ये तळल्या जातात. असा फाफडा बनवल्यानंतर चटणीसह तो सर्व्ह केल्या जातो. तर मैद्याच्या पीठापासून बनवलेली जिलेबी नंतर साखरेच्या पाकात भिजवूनही तयार केली जाते. हे कॉम्बिनेशन गुजरातमध्ये जबरदस्त प्रसिद्ध आहे.