हैदराबाद :कोविड -१९ च्या उद्रेकानंतर हात स्वच्छ करणारे सॅनिटायझर वापरणे ही तातडीची गरज बनली आहे. परंतु सॅनिटायझर विकत घेताना पुरेशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या बाजारात कमी दर्जाच्या आणि बनावटी सॅनिटायझर्सचा पूर आला आहे. बर्याच कंपन्या सुरक्षेचे मापदंड धाब्यावर बसवून लोकांच्या भीतीचे भांडवल करीत आहेत. एफडीएने सॅनिटायझर निर्मित कंपन्याना इथेनॉल वापरण्याच्या सुचना केल्या असताना काही कंपन्या अधिक फायदा मिळवण्यासाठी स्वस्त दरातले मिथेनॉल वापरत आहेत. मिथेनॉलच्या वापरामुळे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात, हे अनेक आरोग्य तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. बनावट सॅनिटायझर युनिट्सबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर ड्रग्स कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन आणि तेलंगणा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी औषध निरीक्षकांना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सॅनिटायझरचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
- योग्य आणि परिणामकारक सॅनिटायझर कसा निवडायचा?
पातळ वाहणारे, लिक्विड सॅनिटायझर्स अधिक प्रभावशाली आहेत. असे सॅनिटायझर हातावर घेतल्यानंतर ६० सेकंदाच्या आत सुकणे आवश्यक आहे. फार चिकट किंवा तेलकट सॅनिटायझर्समुळे तुमच्या त्वचेला विविध विकार होऊ शकतात. लोकांनी मुख्यत्वे अल्कोहोलचा समावेश असणारे सॅनिटायझर वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ज्यामध्ये कमीत कमी ६० टक्के इथेनॉलची मात्रा असणे आवश्यक आहे. तर हाताला सॅनिटायझर लावल्यानंतर किमान २० ते ३० सेकंदांपर्यत आपले हात एकमेकांना चोळणे गरजेचे असते.
- इथेनॉल कि मिथेनॉल?
केवळ एका शब्दामुळे तुम्ही धोका खाऊ शकता, ज्याच्या खुप फरक पडतो. सध्या जगभर उद्भवलेल्या कोरोना विषाणूमुळे सॅनिटाइझरच्या विक्रीला चालना मिळाली आहे. रंगीबेरंगी द्रव्यांनी भरलेल्या आकर्षक बाटल्या सुपरमार्केट्स आणि मेडिकल शॉप्समध्ये आपल्याला दिसून येतात. आपण सॅनिटायझर्सद्वारे अगदी काळजीपूर्वक आपले हात निर्जंतुकीकरण केले असले तरीही, आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नसते की, हे नेमके कसे बनवले जाते. लोकांनी ६० टक्क्यापेक्षा अधिक इथेनॉल (इथाइल अल्कोहोल) किंवा ७० टक्के आयसोप्रोपॅनॉल (आयसोप्रोपाइल अल्कोहोल) चा समावेश असलेल्या सॅनिटाझरचा वापर करावा, असा सल्ला सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिला आहे. तसेच मिथेनॉलने (मिथाइल अल्कोहोल) बनवलेल्या सॅनिटायझरचा वापर करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
- मिथाइल अल्कोहोल आरोग्यासाठी घातक आहे का?
लोकांनी मिथेनॉलपासून बनवलेल्या सॅनिटायझर्सचा वापर टाळण्याचा सक्त इशारा दिला अमेरिकेच्या एफडीए संस्थेने दिला आहे. जेव्हा अशा प्रकारचे सॅनिटायझर त्वचेद्वारे शरीरात मुरते किंवा शोषून घेतले जाते तेव्हा मिथाइल अल्कोहोल धोकादायक ठरू शकते. तसेच हे मोठ्या प्रमाणात प्राणघातकही आहे. मिथेनॉलच्या विषारी दुष्परिणांमुळे मळमळ, उलट्या, दृष्टीहीनता आणि आकडी येणे असे आजार निर्माण होतात. विशेषतः लहान मुले अत्यंत संवेदनशील असल्याने ते मिथेनॉलला लवकर बळी पडू शकतात.
- किती म्हणजे खूप जास्त?