महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Covid Accelerates Dementia : कोरोनामुळे स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना बसला फटका; आजारात दिसून आली वाढ - कोरोनामुळे स्मृतीभ्रंश

कोरोनामुळे स्मृतिभ्रंश असलेल्या नागरिकांवर विपरित परिणाम झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. याबाबतचे संशोधन जर्नल ऑफ अल्झायमर डिसीज रिपोर्ट्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Covid Accelerates Dementia
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 5, 2023, 6:09 PM IST

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील संशोधकांच्या नवीन संशोधनानुसार SARS-CoV-2 च्या संसर्गाचा स्मृतिभ्रंश असलेल्या रुग्णांच्या संज्ञानात्मक कार्यावर लक्षणीय परिणाम होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून न्यूरोलॉजिस्टना या संसर्गजन्य रोगाचा तीव्र आणि दीर्घकालीन दोन्ही न्यूरोलॉजिकल प्रभाव लक्षात आला आहे. कोविडचा मानवी आकलनशक्तीवर होणारा परिणाम अस्पष्ट राहिला. परंतु न्यूरोलॉजिस्टने अनेकदा याला ब्रेन फॉग असे संबोधल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

संशोधकांनी स्पष्ट केली फेड-इन मेमरी संकल्पना :स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांवर कोरोनाचे परिणाम व्यक्त करण्यासाठी संशोधकानी फेड-इन मेमरी ही संकल्पना मांडली आहे. या रुग्णांना थकवा, कमी रक्तप्रवाह, लक्ष कमी होणे, नैराश्य, आदी आजारांचा सामना करावा लागला आहे. स्मृतिभ्रंश असलेल्या 14 रूग्णांमध्ये कोविड-19 चे संज्ञानात्मक कमजोरीवरील परिणाम या संशोधकांनी तपासले. यात स्मृतिभ्रंशाचे चार, रक्तवहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंश असलेले पाच, पार्किन्सनचे तीन आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेंशियाचे दोन रुग्णांचा समावेश होता. यातील रुग्णांना कोरोनानंतर आणखी जास्त त्रास झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन जर्नल ऑफ अल्झायमर डिसीज रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहे.

वयोवृद्ध नागरिकांमध्ये वाढला स्मृतिभ्रंश :SARS-CoV-2 च्या संसर्गानंतर स्मृतिभ्रंशाचे उपप्रकार असलेल्या रुग्णांना जास्त वेगाने स्मृतिभ्रंशाचा अनुभव आला. जसा वयोवृद्ध नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंश वाढत आहे. कोरोनामुळे या नागरिकांमध्ये संज्ञानात्मक कमजोरी आणि इतर प्रकारचे स्मृतिभ्रंश यांच्यात फरक करणे आवश्यक असल्याचे या कोलकाता येथील बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस संशोधनाचे संशोधक डॉ. सौविक दुबे यांनी स्पष्ट केले. या समजुतीचा भविष्यातील स्मृतिभ्रंश संशोधनावर निश्चित परिणाम होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रुग्णांच्या मागील स्मृतिभ्रंश प्रकाराकडे दुर्लक्ष करून विविध प्रकारच्या स्मृतिभ्रंशांमधील सीमांकनाची रेषा कोविड नंतर अस्पष्ट झाल्याचा दावाही या संशोधकांनी केला. कोरोनानंतर स्मृतिभ्रंशाची वैशिष्ट्ये बदलली आहेत. डिजेनेरेटिव्ह आणि व्हॅस्कुलर डिमेंशिया दोन्ही वैद्यकीय आणि रेडिओलॉजिकल दोन्ही मिश्रित स्मृतिभ्रंशा सारखे असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Mobile Phone Complete 50 Years : मोबाईल फोन झाला 50 वर्षाचा; जाणून घ्या काय आहे मोबाईल फोनचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details