महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Independence Day : मैत्रिणींनो स्वातंत्र्यदिनी खास लुकसाठी असा करा पोशाख - तिरंगा साडी

स्वातंत्र्यदिनी डौलदार तिरंगा फडकलेला पाहताना जसे देशभक्तीने ऊर भरुन येते. तसेच या दिवशी कडक इस्त्री केलाला पोषाख घालण्यातही काही और मजा असते. यावे १५ ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या दिवशी खास कार्यक्रमात चमकण्यासाठी तुम्हीही मस्त ड्रेसअप करु शकता. त्यासाठी वाचा काही भन्नाट आयडिया...

Independence Day 2023 India
स्वातंत्र्यदिनी या पोशाखांनी तुमचा लुक बनवा खास

By

Published : Aug 8, 2023, 12:27 PM IST

Updated : Aug 8, 2023, 5:07 PM IST

  • हैदराबाद: आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अतिशय खास दिवस आहे, जो आपण 1947 पासून दरवर्षी साजरा करतो. ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाते. लाडू-जिलेबी वाटल्या जातात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी भारत देश ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. जर तुम्हीही यादिवशी तुम्ही एखाद्या खास फंक्शनला जाणार असाल तर त्यात वेगळे आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काही आउटफिट्स ट्राय करू शकता.
  • तिरंगा साडी :भारतीय महिला-मुलींसाठीसाडी हा प्रत्येक प्रसंगात सुरक्षित आणि खुलून दिसणारा उत्तम पोशाख मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही या दिवशी पारंपारिक पोशाख घालणार असाल तर साडी एक चांगला पर्याय आहे. स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ठ्य म्हणून वेगळे दिसण्यासाठी तुम्ही तिरंगी साडी परिधान करु शकता. एक साडी ज्यामध्ये आपल्या ध्वजाचे तीनही रंग म्हणजे भगवा, पांढरा आणि हिरवा असतो. अशा साड्या आजकाल सहज मिळतात. जर उपलब्ध नसतील तर या तीनपैकी कोणत्याही दोन रंगाची किंवा कोणत्याही एकाच रंगाची साडी नेसता येते. यानिमित्ताने साधी केशर किंवा हिरवी साडीही चांगली आणि स्टायलिश दिसेल. त्याचबरोबर तिरंगी बॉर्डर असलेली शुभ्र पांढरी साडीही खास लुक देऊन जाते.
  • तिरंगा स्कार्फ : जर साडी नेसताच येत नसेल किंवा साडी मिळण्यात काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या पांढऱ्या कुर्त्यासोबत तिरंगी दुपट्टा-ओढणी घेऊन स्वांत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तुमची छाप पाडू शकता. पांढरे कुर्ते सहज मिळतात आणि ते तिरंग्याच्या दुपट्ट्यांशी इतके चांगले जुळतात आणि बेस्ट लुक देतात.
  • तिरंगी सूट :हा कदाचित सर्वात सोपा आणि वेगळा पर्याय आहे. यामध्ये तुम्ही ध्वजातील एका रंगाचा कुर्ता, दुसऱ्या रंगाची सलवार ध्वजाच्या तिसऱ्या रंगाचा दुपट्टा घेऊ शकता. यात हिरवी सलवार सफेद कुर्ता आणि भगव्या रंगाची ओढणी हमखास परफेक्ट लुक देते. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुमचा एकूण लुक खूप सुंदर दिसेल.
Last Updated : Aug 8, 2023, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details