हैदराबाद :आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही मुदत दिली होती. त्यामुळे ३१ मार्चला पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास करदात्यांना दंड करण्यात येणार असल्याचेही आयकर विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून दिली आहे. याबाबतची घोषणा आयकर विभागाने केली असून आता तीन महिने मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून ही करण्यात आली आहे.
आधार कार्डला पॅन लिंक न केल्यास होईल नुकसान :आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करण्याची घोषणाही आयकर विभागाच्या वतीने करण्यात आली होती. त्यासह जर आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसल्यास आयकर विभागाने १ एप्रिलपासून अशा करदात्यांना दंड ठोठावण्याची घोषणाही केली होती. आयकर विभागाने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक न करणाऱ्या करदात्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे जाहीर केले होते. आता मात्र ३० जूनपर्यंत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून दंड आकारण्यात येणार असल्याची माहितीही आयकर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.