हैदराबाद :तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. यामुळेच तुळशीचे रोप जवळपास सर्व हिंदू घरांमध्ये आढळते. आयुर्वेदात औषध म्हणून याचा वापर केला जातो. तुळशीची पाने, मुळे आणि बिया सर्व गुणांनी परिपूर्ण आहेत. त्याचबरोबर वास्तूनुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला एखाद्याला विशेष भेटवस्तू द्यायची असेल, तर त्यासाठी तुळशीची वनस्पती हा एक उत्तम पर्याय आहे. पण तुळशीला भेट म्हणून देण्याचे काही नियमही वास्तूशास्त्रात सांगितले आहेत. ते नियम जाणून घेऊया.
तुळशीचे भेट दिल्याचे फायदे :तुळशीचे रोप एखाद्याला भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. तुळशीचे रोप भेट म्हणून देणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करत आहात. यासोबतच भेटवस्तू घेणार्या व्यक्तीच्या घरात समृद्धीसोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीची वनस्पती हवा शुद्ध करण्यास आणि नकारात्मक शक्तींपासून घराचे संरक्षण करण्यास मदत करते.
या गोष्टी लक्षात ठेवा :एखाद्याला तुळशीचं रोप भेट म्हणून देताना हे लक्षात ठेवा की एकादशी किंवा रविवारी तुळशीचे रोप इतर कोणालाही देऊ नये. कारण या दिवसात तुळशीचा स्पर्श निषिद्ध मानला जातो. तसेच, तुळशीचे रोप कोरडे नसावे हे लक्षात ठेवा. तुळशीचे रोप एका भांड्यात लावावे आणि भेट म्हणून द्यावे. वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप ठेवल्याने अनेक फायदे होतात.
कोणत्या दिवशी तुळशीचे रोप दान करावे ? तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे शुभ आहे, परंतु ते भेट देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला तुळशीचं रोप भेट देता तेव्हा ती पूर्णपणे निरोगी असावी आणि प्राप्तकर्त्याने त्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. ज्योतिष शास्त्रात काही दिवस सांगितले आहेत ज्यात तुळशीला स्पर्श करणे निषिद्ध आहे. अशा कोणत्याही दिवशी तुळशीचे रोप इतर कोणत्याही व्यक्तीला भेट देऊ नका.
हेही वाचा :
- Foods for Hair : पावसाळ्यात होतेय केस गळती; या खाद्यपदार्थांनी बनवा केस अधिक सुंदर
- Thyroid related problems : थायरॉईडचा त्रास कमी होण्याकरिता योगाभ्यास ठरू शकतो फायदेशीर
- Bleeding gums : हिरड्यात रक्तस्त्राव? तुमच्यासाठी आहेत या टिप्स...