नवी दिल्ली : वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिना सुरू होताच लोक प्रवासाचा विचार करतात, प्रत्येकजण आपापल्या परीने सहलीचे प्लॅन्स बनवतो. साहजिकच या डिसेंबर महिन्यात दोन मोठे दिवस आहेत आणि ते म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे आगमन. अशा स्थितीत हे वर्ष जात असताना काही चांगल्या आठवणी निर्माण कराव्यात. तसेच या येणाऱ्या नवीन वर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत व्हावे, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे या महिन्यातच बहुतेक जण सहलीला जातात. अशा परिस्थितीत, आज आम्ही डिसेंबर महिन्यात भेट देण्यासाठी भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणे घेऊन आलो आहोत, जी खूप खास आणि सुंदर आहेत. जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल... (Winter Travel Destination)
मनाली :मनाली हे देशातील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. होय, मनाली हे असे ठिकाण आहे की ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ऑफ सिझनमध्येही हजारो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. मनालीच्या सौंदर्यात हिवाळ्यात भर पडते. येथील बर्फाने झाकलेले उंच पर्वत पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. या वर्षीच्या सुट्ट्या तुम्ही इथे छान घालवू शकता.
पुद्दुचेरी :पुद्दुचेरी त्याच्या सुंदर लँडस्केपसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला भारताची पारंपारिक संस्कृती तसेच फ्रेंच वास्तुकला पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत आता डिसेंबर महिन्यात येथे फिरणे तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या सुट्टीचा आनंद शांततेत घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.