हैदराबाद :चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग, पिंपल्स तुमचे सौंदर्य कमी करू शकतात. याशिवाय त्वचाही कमी गोरी दिसते पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या काही सवयींमुळे चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये योग्य आहार ते त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, तुम्ही कोणत्या प्रकारची उत्पादने वापरता, तुम्ही तुमचा चेहरा कसा धुता आणि तुम्ही तुमचा चेहरा कसा पुसता हे सर्व डागांमध्ये योगदान देऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या सवयींमुळे चेहऱ्यावर काळे डाग पडू शकतात.
हेल्दी फूड न खाणे :हेल्दी फूड न घेतल्याने चेहऱ्यावर काळे डाग आणि पुरळ येऊ शकतात. जास्त तळलेले, मसालेदार, जंक फूड खाणे आपल्या आरोग्यासाठी किंवा त्वचेसाठी चांगले नाही. या पुरळांवर वेळीच उपचार न केल्यास ते कायमचे डाग मागे ठेवतात. ते कमी करण्यासाठी आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. भरपूर पाणी प्या आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खा.
चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे : काही लोकांना वारंवार चेहऱ्याला स्पर्श करण्याची खूप वाईट सवय असते. यामुळे चेहऱ्यावर काळे डागही येऊ शकतात. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स काढण्यासाठी बहुतेक लोक नखे किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूचा वापर करतात जे अत्यंत चुकीचे आहे. ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी डेकेअर रूटीन फॉलो करा. CTM (क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग) दिनचर्या फॉलो करा. दिवसातून दोनदा चेहरा धुवा. यासोबत रोज व्हिटॅमिन सी सीरम लावा.
सूर्यकिरणांचा अतिरेक :सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असतात. मेलॅनिन खरं तर आपल्या त्वचेत आढळते. हे अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते परंतु संरक्षणाशिवाय दीर्घकाळ सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.
हेही वाचा :
- Drumstick Benefits : शेवग्यामध्ये आहे अविश्वसनीय पोषण; जाणून घ्या शेवगाचे हे फायदे
- Makhana Benefits For Health : वजन कमी करण्यापासून ते ताकद वाढण्यापर्यंत, रोज मखना खाल्ल्याने मिळू शकतात अनेक फायदे
- Mental Health Tips : तुमचे मन अनेकदा अस्वस्थ असते का ? शांत कसे राहायचे ते शिका