महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Liver Disease : शरीराच्या या भागांमध्ये सूज येते ? करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा आजार... - खाण्याकडे जास्त लक्ष

आजकाल आपण आपल्या खाण्याकडे जास्त लक्ष देत नाही. चुकीच्या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्या गेल्याने आपण अनेक निरनिराळ्या आजारांचे बळी होत आहोत. याचा थेट परीणाम यकृतावर होतो. जाणून घ्या कारणे आणि लक्षणे...

Liver Disease
आजार

By

Published : Jul 19, 2023, 4:54 PM IST

हैदराबाद :आपल्या शरीरात यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे. यासंबंधीत कोणत्याही समस्या असल्यास त्याचा तुमच्या शरीरावर परीणाम होतो. त्यामुळे यकृत चांगले राहणे फार महत्त्वाचे असते. कृत आपल्या शरीरातील 500 हून अधिक प्रक्रियांसाठी जबाबदार आहे. पचन तसेच रक्त शुद्धीकरणात याचा मोठा हातभार असतो. अयोग्य आहार आणि जीवनशैलीचा यकृतावर सर्वाधिक परिणाम होतो. जेव्हा यकृतामध्ये चरबी जमा होते तेव्हा यकृताला सूज येते आणि यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे पुढे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे यकृत निकामी होण्याचा आणि लिव्हर सिरोसिसचा धोका वाढतो. शरीराच्या सांध्यांना सूज येणे हे यकृतातील फॅटी डिपॉझिटचे प्रारंभिक लक्षण आहे.

फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे : फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत. पण रोग जसजसा वाढत जातो तसतसे समस्याही वाढतात. यासोबतच रुग्णाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. डॉक्टर सीटी स्कॅन इमेजिंग चाचणीची शिफारस करतात. याशिवाय रक्त तपासणीचाही सल्ला दिला जातो. या सर्व चाचण्या यकृताची स्थिती ठरवू शकतात. यकृतातील समस्या ओळखल्यानंतर डॉक्टर त्यावर औषधोपचार सुरू करतात. यकृताशी संबंधित समस्या सामान्यतः पोटदुखी, अपचन आणि थकवा असतात.

यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे शरीराच्या या अवयवांमध्ये जळजळ होते :

पोट फुगणे:जेव्हा यकृतामध्ये चरबी जमा होण्याची समस्या सुरू होते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो. कारण या आजारात यकृताचा आकार बदलू लागतो. त्यामुळे पोटाला सूज येते. या सर्व गोष्टींकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे या समस्या वाढण्याचा धोका आहे.

पायांना सूज येणे :यकृतामध्ये चरबी जमा झाल्यामुळे पायांना सूज येऊ लागते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या पायात सूज आल्याने त्रास होत असेल, तर दुखापत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर पायांवर दीर्घकाळ सूज असेल तर ते यकृतामध्ये फॅटी जमा होण्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. जेव्हा तुमचे यकृत नीट काम करत नाही, तेव्हा रक्ताभिसरणावरही परिणाम होतो आणि पाय सुजतात.

बोटांमध्ये सूज : यकृतातील कोणत्याही प्रकारची समस्या थेट परिणाम करते. त्यामुळे कुरूप सूज येऊ लागतात. फॅटी लिव्हरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. हा आजार मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना होतो. त्यामुळे ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

हेही वाचा :

  1. Aloe Vera for Hair : केस चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा कोरफडीचा हेअर पॅक
  2. Parkinsons disease : पार्किन्सन रोग शांतपणे वाढत असल्याची शक्यता; रोगाची लक्षणे कमी करण्याचे नवीन मार्ग
  3. Peanuts For Health : वजन कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शेंगदाण्याचे फायदे जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details