काही पालक येऊन सांगतात, की त्यांचे मूल बराच काळ वैद्यकीय उपचार घेत असल्याने त्याचा अभ्यासातला रस कमी होत आहे. दुसरे पालक अपत्याबद्दल काळजी व्यक्त करत सांगतात की त्यांना शिकवणे खूपच कठीण आहे. कारण एकदा का ते खेळून आले की कंटाळतात आणि मग ते अभ्यासाला बसत नाहीत. मुलाला अभ्यासासाठी बसवणे महाकठीण काम. पण त्याच वेळी आपल्याला हेही समजून घ्यायला हवे की मुलांसाठी ‘खेळ‘ सर्व काही आहे. तेव्हा या दोन्हीमध्ये समतोल कसा काय साधायचा?
मुंबईच्या बोरिवली इथल्या प्रफुल्ता सायकॉलॉजिकल वेलनेस सेंटर मधील करियर समुपदेशक आणि माइंडसाइट, माइंडार्ट, कॉफी कनर्व्हरसेशन्सच्या मानसशास्त्रज्ञ आणि प्ले थेरपिस्ट काजल दवे यांनी मुलांना खिलाडू पद्धतीने अभ्यासात कसे गुंतवायचे याच्या काही टिप्स दिल्या.
मुलांना खेळताना सामर्थ्यवान वाटते. तसेच त्यांना तणावरहित वाटते आणि मुले खेळताना सृजनशील होतात.
- समजा मुलाला धडे वाचण्यात रस नसेल तर त्याला कथा सांगणे किंवा कथेतल्या व्यक्तिरेखा साकारणे हे करायला सांगा.
- समजा मुलांना अर्थ शिकणे कठीण जात असेल तर त्या संकल्पनेचे गुण वर्णन करा आणि ‘ ओळखा पाहू ‘ हा खेळ खेळा. तुमच्या मुलाचे मन चित्रे काढण्यात रमत असेल , तर तुम्ही माध्यम म्हणून चित्रांची डिक्शनरी वापरू शकता.
मुलाने पूर्ण झोकून शिकायचे असेल तर त्याला त्या विषयात रस असणे हे खूप महत्त्वाचे ठरते. समजा मुलाला एखादा विषय अजिबात आवडत नसेल, तर कदाचित वेगवेगळ्या भावना त्या विषयासंबंधी असू शकतील. उदाहरणार्थ गणिताबद्दलची भीती, लिहायची इच्छा नसणे आणि या सर्वामध्ये आणखी भावनेची भर पडते ती म्हणजे मुलाला तणाव जाणवतो, त्याचा शिकण्यातला रस जातो आणि हे सर्व कसे झेपवायचे याबद्दलची चिंता त्याला जाणवायला लागते. समजा मुलाच्या डोक्यावरून इंग्लिश भाषा जात असेल, तर नाट्य रूपांतर करा किंवा व्यक्तिरेखा रेखाटा आणि गोष्ट किंवा संवादांचा वापर करून जास्त सृजनशील करता येईल. त्यामुळे मुलांवरचा तणाव कमी होईल.