यूट्रेक्ट विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि औषधशास्त्राचे प्राध्यापक अल्बर्ट जे आर हेक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असल्याचे दिसून येते. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी निरोगी आणि आजारी लोकांच्या रक्तामधील अँटिबॉडीज मोजल्यानंतर प्रतिकारशक्तीमधील हा फरक शोधला.
रोग प्रतिकारशक्तीवरील हे संशोधन स्पष्ट करू शकते की, काही लोकांसाठी कोविड 19 ची लस कमी प्रभावी का दिसून येते? त्याचबरोबर, हे संशोधन व्यक्तींमध्ये विशेषत: प्रभावी अँटिबॉडीची ओळख करणे, त्यांना मिळवणे आणि इतरांना बरे करण्यासाठी त्यांचा वापर याबद्दल माहिती प्रदान करते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शरीराचा अनेक जंतूंशी सामना होतो आणि ते त्याचावर हल्ला करतात. ते आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या शरीरात खूप हुशारीने प्रवेश करतात. सुदैवाने आपल्याकडे एक शक्तिशाली संरक्षण प्रणाली आहे, ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती.
जर आपली रोग प्रतिकारशक्ती चांगल्याने काम करत असेल तर, आपण सतत आणि आक्रमकपणे आपल्यावर हल्ला करणाऱ्या बहुतेक जंतूशी यशस्वीरित्या लढू शकतो. हल्ला करणाऱ्या जंतूंना अप्रभावी करण्यासाठी आपल्या शस्त्रागारमधील प्रथिने रेणू हे आपले शस्त्र असते ज्यांना अँटिबॉडीज देखील म्हटले जाते.
प्रत्येक जंतूचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांची (अँटिबॉडी) गरज पडते. आपल्या शरीराने आपल्याला अब्जावधी भिन्न अँटिबॉडी पुरवले आहेत, ही चांगली बाब आहे, परंतु या सर्व अँटिबॉडी एकाच वेळी तयार होऊ शकत नाही. अनेकदा काही विशेष अँटिबॉडी एका विशेष जंतूच्या हल्ल्याच्या वेळीच तयार होतात.
आपल्याला जिवाणूंचा संसर्ग झाल्यास त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण अँटिबॉडी बनवतो. जर आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली तर, आपण त्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी अँटिबॉडी बनवू लागतो. फ्ल्यू विषाणूची लागण झाल्यास देखील आपण परत इतर अँटिबॉडी बनवतो.
रक्तात किती वेगवेगळ्या अँटिबॉडी तयार होतात आणि आपल्या रक्तात किती अँटिबॉडी आहेत हे एकेकाळी माहीत नव्हते. बऱ्याच शास्त्रज्ञांनी अंदाज लावला की, ते कित्येक अब्जांपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच ते जवळजवळ अथांग आहे.