डब्लिन :रात्रीची खराब झोप तुमच्या कार्यालयीन कामावर विपरित परिणाम करते. त्यामुळे रात्रीची झोप न झाल्यास दिवसभर आपल्याला अस्वस्थ वाटते. कामावर लक्ष लागत नाही. इतकेच काय दिवसही लवकर जात नाही. चांगली झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असल्याचे संशोधक स्पष्ट करतात. चांगली झोप न झाल्यास कार्यालयात कामावर लक्ष कसे केंद्रीत करायचे याबाबतची ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.
सहकाऱ्यांवर अपमानास्पद टीका :रात्रीच्या खराब झोपेचा कामाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. आपण कोणत्याही नकारात्मक प्रभावांना तोंड देऊ शकतो. संशोधनाने चांगले काम करण्यासाठी झोप महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची झोप व्यवस्थित झाली नसल्यास त्याचे कार्यालयातील वर्तन चांगले होत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे कर्मचार्यांना उशीर होण्याची शक्यता असते. कर्मचारी अनैतिक वर्तनात गुंतण्याचीही शक्यता असते. यात एखाद्याच्या कामाचे श्रेय घेणे, आदी वर्तनाचाही समावेश असतो. व्यवस्थापकांची झोप न झाल्यास ते त्यांच्या कर्मचार्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचेही डब्लिन येथील ट्रिनिटी महाविद्यालयातील असोसिएट प्राध्यापक व्लादिस्लाव रिवकीन यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे.
झोपेचा इच्छाशक्तीवर होतो परिणाम :झोप ही संज्ञानात्मक कौशल्यांसाठी विशेषतः महत्वाची आहे. झोपेमुळे आपल्याला विचारांसह वर्तन नियंत्रित करण्यास मदत होते. आपण जे काही काम करतो, त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. आपल्या आवेग आणि भावनांवर इच्छाशक्तीमुळे नियंत्रण ठेवता येते. मात्र झोप चांगील न झाल्यास आपल्या इच्छाशक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
असे करु शकता चांगले काम : अनेक संशोधनातून चांगल्या झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरणे टाळा, संगणकावर काम करणे टाळा, आदी सूचना या संशोधनातून देण्यात येतात. मात्र तरीही आपल्यापैकी बहुतेकांना तणाव वाटत असल्यास दुसऱ्या दिवशी कामावर चांगले कार्य कसे करू शकतो, असा सवालही निर्माण होतो. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी या काही टीप्सचा तुम्ही उपयोग करू शकता.