हैदराबाद :सध्या कमालीची धकाधकाची जीवनशैली झाल्याने तरुण वर्ग अडचणीचा सामना करत आहे. त्यातही मूड स्विंग आणि कामाचा ताण यामुळे रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते. त्यात भूक लागल्यानंतर काही खाणे गरजेचे असते. मात्र काम सोडून खाऊ शकत नाही, किवा कामही सोडू शकत नाही. त्यामुळे अल्पावधीची भूक भागवण्यासाठी तरुण वर्ग तळलेल्या चिप्सवर ताव मारतात. मात्र तळलेले चिप्स चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही आरोग्यवर्धक गोष्टी खाण्याचा पर्याय येथे देत आहोत.
पॉपकार्न (Popcorn ) :तळलेल्या चिप्समुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे चिप्सला पर्याय म्हणून पॉपकॉर्न हा सर्वोत्तम आहे. हे बटाट्याच्या चिप्स सारखेच समाधानकारक क्रंच देते. परंतु यात चांगल्या कॅलरीज असतात. त्यासह चरबी वाढण्यासही पॉपकॉर्न कारणीभूत ठरत नाही. यात फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. त्यासाठी तुम्ही पॉपकॉर्नवर थोडे मीठ टाकून त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.
ग्रॅनोला बार (Granola Bar ) :कामाच्या तणावामुळे जास्त थकून गेल्यावर तरुणांना पॉवर बूस्टची गरज असते. त्यांच्यासाठी ग्रॅनोला बार हा एक झटपट होणारा नाश्ता आहे. मात्र त्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याची खात्री करुन घ्यायला हवी. ओट्स, बेरी, सुकी फळे याचा यामध्ये वापर करण्यात आलेला असतो. यात सुक्या फळात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. त्यामुळे घरी बनवलेला ग्रॅनोला कामाचा सगळा ताण घालवण्यास मदत करणारा ठरू शकतो.