महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Health Tips : 'ही' फळे खाल्यानंतर कधीही पिऊ नका पाणी; होऊ शकते हे नुकसान... - खरबूज

तंदुरूस्त राहण्यासाठी आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे असते. यामध्ये नैसर्गिक जीवनसत्त्वे, खनिजे, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. फळं खाल्याने तुम्ही अनेक आजारांना पळवून लावू शकता. पण तुम्हाला माहित आहे का काही फळे खाल्यानंतर पाणी पिल्याने होऊ शकते मोठे नुकसान....

Health Tips
फळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 3:43 PM IST

हैदराबाद :आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. फळांमध्ये शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक असतात. नियमित फळे खाल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. पण तुम्हाला माहिती आहे का, अशी काही फळे आहेत जी खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पचनास त्रास होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती फळे, जे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.

  • सफरचंद :सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचनक्रिया निरोगी ठेवते. पण सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. यामध्ये असलेले फायबर तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचत नाही आणि तुमची पचनक्रिया नीट होत नाही. त्यामुळे गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो.
  • जांभूळ :जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर फळ आहे. त्याच्या बियां देखील गुणकारी असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास खोकला आणि सर्दी होऊ शकते. म्हणूनच जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
  • टरबूज : लोकांना टरबूज खायला आवडते. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. या फळामध्ये फ्रक्टोज देखील असते, ज्याला नैसर्गिक साखर म्हणतात. टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याने पोटाशी संबंधित आजार होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • केळी : क्वचितच कोणी असेल ज्याला केळी खायला आवडत नसेल. केळीमध्ये हेल्दी फॅट्स, कॅल्शियम इत्यादी असतात, मात्र केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होते. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते. म्हणूनच केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.
  • खरबूज: खरबूज देखील चवदार आणि रसाळ फळ आहे. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच पाणीदार फळे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. खरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details