हैदराबाद : ख्रिश्चन धर्मात येशूला देवाचा पूत्र मानण्यात येते. त्यामुळे ख्रिश्चन धर्मीय बांधव चर्चमध्ये जाऊन येशू यांची पूजा करतात. गुड फ्रायडे या दिवशी येशूला क्रॉसवर लटकविण्यात आले. त्यामुळे या दिवसाला काळा दिवस असेही संबोधले जाते. ख्रिश्चिन बांधव या दिवशी कोणताही सण साजरा करत नाहीत. तर चर्चमध्ये जाऊन येशूची माफी मागत आपले पापक्षालन करतात. या दिवसाला ब्लॅक फ्रायडे असेही संबोधण्यात येते. त्यामुळे जाणून घेऊया नेमके काय आहे या दिवसाचे महत्व.
काय आहे येशू यांना क्रॉसवर खिळवल्याचा इतिहास :मानवाच्या कल्याणासाठी देवाने आपला पूत्र येशूला पृथ्वीवर पाठवल्याची अख्यायिका बायबल या ख्रिश्चन धर्मग्रंथानुसार वर्तवण्यात येते. त्यामुळे येशू व्हॅटीकन सिटी आणि रोममधील नागरिकांना देवाविषयी माहिती देत असत. मात्र त्यांचा शिष्य यहुदाने 30 चांदीच्या नाण्यासाठी फितुरी करत येशूची माहिती रक्षकांना दिली. त्यामुळे येशूचा शिष्य जुडास इस्किरिओट याच्या नेतृत्वाखाली गेथसेमानेच्या बागेत रक्षकांनी येशूला अटक केल्याची अख्यायिका वर्णन करण्यात येते. देवाचा पूत्र असल्याचा दावा केल्याने येशूला देशद्रोही ठरवून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. यावेळी रोमन गव्हर्नर पॉन्टियस पायलट यांनी येशू यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे कथन केले. मात्र येशू देवाचा पूत्र असल्याचा दावा करत असल्याचे सांगितल्याने जमाव संतप्त झाला. त्यामुळे दंगल टाळण्यासाठी त्याने येशू यांना जमावाच्या ताब्यात दिले. त्यानंतर जमावाने तब्बल 6 तास येशू यांना क्रॉसवर खिळ्याने ठोकून प्रचंड हाल केल्याचे वर्णन ख्रिश्चन धर्मग्रंथात करण्यात येते.