हैदराबाद : सध्या गुड फ्रायडेमुळे सलग सुट्ट्या आल्याने नागरिकांनी पर्यटनाला चांगलेच महत्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा फायदा ओयो या हॉटेलच्या व्यवसायाला चांगलाच झाल्याचे दिसून आले. ओयोने सलग सुट्ट्यांमुळे बुकींचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ओयोच्या बुकिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 167 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ट्रॅव्हल टेक फर्मने दिली आहे. समुद्र किनाऱ्यांवरील ठिकाणांची मागणी 57 टक्क्यांनी वाढली आहे. तर हिल स्टेशन्सची मागणी 43 टक्क्यांनी वाढल्याचा दावाही या कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.
तीर्थक्षेत्रांना आहे जास्त मागणी :सलग सुट्ट्यांमुळे अनेक ठिकाणचे समुद्र किनारे फुल्ल झाले आहेत. त्यासह हिल स्टेशनचे बुकींगही फुल्ल झाले आहेत. मात्र त्यासह अध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्रांनाही नागरिक भेट देत असल्याचे बुकींग ट्रेंडवरुन सिद्ध होत आहे. भारतीय प्रवासी सुट्ट्यांमध्ये लक्झरीपेक्षा आध्यात्मिक ठिकाणांना जास्त प्राधान्य देत असल्याचेही या कंपनीने स्पष्ट केले आहे. वाराणसी, पुरी, शिर्डी, अमृतसर आणि हरिद्वार या तीर्थक्षेत्रांना सर्वोच्च पर्याय म्हणून पाहण्यात आले आहेत. ओयोने तिरुपती, मथुरा, वृंदावन आणि मदुराई हे देखील लाँग वीकेंडसाठी बुकिंग मागणीमध्ये सर्वोच्च पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे.