महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Fenugreek Hair Pack : दाट केस हवेत ? तर मग 'असा' बनवा मेथी हेअर पॅक - fenugreek hair pack

केस निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांची योग्यरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. हल्ली प्रदूषणामुळे केस गळतीच्या समस्या उद्भवतात. विविध प्रकारच्या प्रिस्क्रिप्शनचा अवलंब करण्यासोबतच महागडे प्रोडक्ट्स वापरले जातात. पण, केसांच्या समस्या तिथेच संपत नाहीत. अशावेळी केस दाट करण्यासाठी तुम्ही मेथी हेअर पॅक वापरू शकता.

Fenugreek Hair Pack
मेथी हेअर पॅक

By

Published : Jan 16, 2023, 4:18 PM IST

हैदराबाद : केसांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आपण नेहमीच नवनवीन प्रोडक्ट्स वापरतो. परंतु केस गळती काही केल्या थांबत नाही. अशावेळी केस दाट करण्यासाठी तुम्ही खाली दिलेला मेथी हेअर पॅक वापरू शकता. चला तर जाणून घेवूया हेअर पॅक बनवण्याची पद्धत.

1. मेथी, दही हेअर पॅक :मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला. दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये बारिक पेस्ट करून घ्या. नंतर या पेस्टमध्ये दही घाला. हे मिश्रण केसांना लावा. केस 45 मिनिटे एका प्लास्टीक बॅगने झाकून घ्या. त्यानंतर तुम्ही केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा वापरू शकता.

2. मेथीची पावडर तयार करा :आता ही पावडर एका भांड्यात ठेवा आणि त्यात 2 चमचे खोबरेल तेल घाला. नंतर ते केसांना 30 मिनिटे लावून ठेवा. केस शॅम्पूने धुवा.केस धुताना हर्बल शॅम्पूचा वापर करावा. खोबरेल तेल तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. जर तुम्ही खोबरेल तेल आणि मेथी पॅक केसांना लावला तर केसगळतीपासून सुटका मिळेल.

4. मेथी, नारळाचे दूध आणि लिंबू :सर्वप्रथम मेथी दाणे रात्रभर भिजत घाला. दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये नारळाचे दूध आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण टाळूवर लावा. साधारण एका तासाने केस धुवा. तज्ज्ञांच्या मते मेथीच्या दाण्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. या छोट्या पिवळ्या रंगाच्या बियांमध्ये अनेक मोठे फायदे लपलेले आहेत. हे केसांसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. याचा वापर करून केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून केसांच्या मुळांमध्ये लावल्यास केस गळणे थांबते आणि चमक येते. मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्या हवे. असे केल्याने मधुमेहाच्या रूग्नांना साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते. त्यामुळे मधुमेहामध्ये खूप फायदा होतो.

हेही वाचा :त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वापरा व्हिटॅमिनई कॅप्सूल, होतील अनोखे फायदे

ABOUT THE AUTHOR

...view details