आजकाल दररोजच्या धावपळीमुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तिंना अशक्तपणाला (Weakness) सामोरे जावे लागतेच. तरुणांनासुद्धा बॉडी विकनेसचा (Body Weakness) सामना करावा लागतो. यामागे खूप श्रम, शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषणमूल्यांचा आणि जीवनसत्त्वांचा अभाव (Lack of nutrients and vitamins), पाणी कमी प्रमाणात पिणे तसेच सिगारेट आणि कॅफीनचे (Excessive consumption of cigarettes and caffeine) अतिसेवन करणे अशा बऱ्याच कारणांचा समावेश असू शकतो. यासाठी बरेच घरगुती पदार्थ (Homemade Remedies) उपलब्ध असतात. चला तर मग पाहूया असे कोणते पदार्थ आहेत. शरीरातील ऊर्जेची (Boosting Energy) पातळी वाढवणे खूप महत्वाचे असते.
Home Remedies for Weakness : सतत अशक्तपणा जाणवतोय? मग करा 'हे' घरगुती उपाय - अशक्तपणा कमी करण्याकरिता उपाय
ताणतणाव, अतिव्यस्त जीवनशैली यामुळे शरीरात सतत अशक्तपणा जाणवतो. शरीरात सातत्याने जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि टॉनिक घेतली जातात, मात्र स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करून शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवता येऊ शकते.
घरगुती उपाय:मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा. दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. दररोज एक ग्लास सफरचंदाचा आणि बीटचा ज्यूस प्यावा. ज्यूसमध्ये चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. नियमित बीट खावे. आरोग्यासाठी कच्च्या बिटाची कोशंबीर अधिर फायदेशीर ठरेल.
दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या. तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल. झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे. लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो.