हैदराबाद : लष्कर, दुतावास, संशोधन संस्थेमध्ये हेरगिरीसाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यात अडकवले जाते. लष्कर जवानांनादेखील हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनिय माहिती काढली जाते. परंतु काही अशी प्रकरणे समोर आली आहेत की, ज्यात सामान्य नागरिकांदेखील हनी ट्रॅपमध्ये अडकवले जात आहे.
शेअर केले जातात न्यूड फोटो :देशभरात हनी ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हनी ट्रॅपमध्ये एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी जवळीकता वाढवली जाते. त्याला शरीर सुखाची ऑफर दिली जाते. न्यूड व्हिडिओ कॉल केले जातात, काही न्यूड फोटो पाठवली जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. नुकतेच पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे हनी ट्रॅपचे शिकार झाले आहेत.
सोशल मीडियातून होते फसवणूक :पाकिस्तानी गुप्तहेरांनी कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. कुरुलकर यांचा विश्वास संपादित करण्यासाठी हनी ट्रॅप करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यानंतर कुरुळकर यांनीही तशाच प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आणि हनी ट्रॅपचे शिकार झाले. ब्लॅकमेल केल्यानंतर प्रदीप कुरुळकर यांनी भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानी आयएसआयला दिली असल्याचं एटीएसने सांगितले आहे.
हे आहेत सॉफ्ट टार्गेट :ज्येष्ठ नागरिक हे हनी ट्रॅपसाठी सॉफ्ट टार्गेट झाले आहेत. यात अडकल्यानंतर आपली अब्रु वाचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासही जात नाहीत. परंतु अशा काही गोष्ट घडत असतील तर त्वरीत पोलिसांमध्ये तक्रार करावी.