बहुतांश भारतीयांची सकाळची सुरुवात ही चहाने होते, मात्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. केवळ चहाच नव्हे तर, अनेक आहार आणि पेय पदार्थ असतात ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, सामान्यत: लोक याबाबत माहिती घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे आहे आणि कोणते पदार्थ नुकसान पोहोचवतात, याबाबत अधिक माहितीसाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' उत्तराखंडच्या पोषण तज्ज्ञ डॉ. मिताली चंद यांच्याशी बातचीत केली.
सकाळी उठल्याबरोबर चहा - कॉफी टाळा
डॉ. मिताली सांगतात की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन पोटात जळजळ किंवा अॅसिडचे कारण ठरू शकते. यांपेक्षा ग्रीन टी किंवा गरम पाण्यात एक चम्मच सहद टाकून त्याचे सेवन करणे फायदेशीर असते, कारण त्यांच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात, त्याचबरोबर ते इम्युनिटीला मजबूत ठेवण्यासोबतच पाचन क्रिया देखील चांगली करतात. इतकेच नव्हे तर, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी किंवा गरम दुधाचे सेवन देखील शरीरासाठी फायदेशीर असते. परंतु, जर कोणाला सर्दी किंवा कफची समस्या असेल तर, रिकाम्या पोटी दूध घेणे टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त इतरही काही पदार्थ आहेत ज्यांचे चहाच्या ऐवजी सेवन शरीराला फायदा पोहोचवू शकतात.
सकाळी चहा ऐवजी गव्हाच्या गवताचे पावडर (व्हीट ग्रास) मिसळलेल्या पाण्याने पाचन तंत्राला खूप लाभ मिळतो आणि बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळते. गव्हाच्या गवताच्या पावडरमध्ये अँटी - ऑक्सिडेंट्स व फ्री रॅडिकल्स असतात जे शरीराची सुरक्षा करतात.
रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन देखील फायद्याचे असते. कोमट पाण्यात एक किंवा दोन चम्मच आवळ्याचे रस मिसळून पिल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
रिकाम्या पोटी अॅलोव्हेराचे ज्यूस पाण्यात मिसळून पिणे देखील आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. अॅलोव्हेरामध्ये प्रोटीन आणि विटामिन मोठ्या प्रमाणात असतात जे शरीराला बळकट बनवून ठेवण्यासाठी मदत करतात. ते शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात.